Dog Shelter Viral Video : ११ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या श्वानांना आठ आठवड्यांत रस्त्यांवरून नवीन निवारागृहांमध्ये (shelters) हलवण्याचे आदेश दिले. नागरिकांना भीती न बाळगता, सुरक्षितपणे आणि मोकळेपणाने रस्त्यावर फिरण्याचा मूलभूत हक्क आहे आणि ते शक्य व्हावे यासाठी ही कार्यवाही आवश्यक आहे, असे यामागचे कारण सांगण्यात आले आहे. या वादग्रस्त परिस्थितीदरम्यान काही दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे, ज्यात भारतातील एका डॉग शेल्टरचे दृश्य दाखविण्यात आले आहे.

पण, आम्हाला तपासादरम्यान आढळले की, हा व्हिडीओ भारतातील नसून इराकमधील आहे…

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर @VBanaras यांनी हा व्हायरल व्हिडीओ त्यांच्या प्रोफाइलवर शेअर केला आहे. व्हिडीओत असंख्य भटके श्वान एकत्र एका मैदानात जमले आहेत. काही जण अन्न-पाण्याचा शोध घेतानाही दिसत आहेत. तसेच ‘श्वानप्रेमींनो, इथे जा आणि तुम्हाला हव्या त्या श्वानांना खायला द्या. परदेशी जातींचे श्वान विकत आणण्यापेक्षा यातले काही श्वान तुम्ही घरी नेऊ शकता’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे.

इतर युजर्सही असाच दावा करून, हा व्हिडीओ शेअर करीत आहेत…

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये हा व्हिडीओ अपलोड केला आणि रिव्हर्स इमेज सर्च करून, तपास सुरू केला.

आम्हाला हा व्हिडीओ अनेक प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्याचे आढळले. व्हिडीओवरील मजकुरात म्हटले होते की, हा व्हिडीओ इराक येथील आहे.

आम्हाला आणखी एक व्हिडीओ सापडला, जो इराकच्या एर्बिलमधील एका डॉग शेल्टरचा आहे.

https://www.instagram.com/reel/DNTcnEwzBEv

आम्हाला ‘Give me your voice’, ‘Ben N. C. Hoffmeister’ या इन्स्टाग्राम हँडलवर १० मार्च रोजी अपलोड केलेला व्हिडीओदेखील आढळला.

हा व्हिडीओ सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्याआधी अनेक महिने आधी अपलोड करण्यात आला होता. त्याचप्रमाणे २२ ऑगस्ट रोजी भटक्या श्वानांना शेल्टर होममधून सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; पण त्यासाठी सुप्रीम कोर्टाने अट देण्यात आली आहे. ज्या श्वानांना रेबीज आहे किंवा ज्यांना रेबीज असल्याचा संशय आहे त्यांना सोडलं जाणार नाही. रेबीजग्रस्त श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करावे. पण, त्यांना सोडून देण्यात येणार नाही. असे न्यायालयानं नगरपालिकांना भटक्या श्वानांना खायला देण्यासाठी एक जागा नियुक्त करण्याचेही निर्देश दिले आहेत.

निष्कर्ष : व्हायरल होत असलेला भटक्या श्वानांचा व्हिडीओ भारतातील नसून, तो इराकमधील खूप जुना व्हिडीओ आहे. त्यामुळे व्हायरल केला गेलेला दावा दिशाभूल करणारा आहे.