Fact Check Viral Video Peoples Walking On Streets With Indian Flag : ‘लाईटहाउस जर्नलिझम’ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जाणारा एक व्हिडीओ सापडला आहे. या व्हिडीओमध्ये लोक भारतीय ध्वज घेऊन रस्त्यांवरून चालताना दिसत आहेत. जिथे बहुतांश लोक नेपाळचे आहेत; त्यामुळे हा व्हिडीओ नेपाळमधील असल्याचा दावा केला जात होता. तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ भारतातील ‘तिरंगा यात्रा’ मधील आहे, त्यामुळे व्हायरल होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे.

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर @suneel.rathour.104 ‘सुनील राठौर’ यांनी हा व्हिडीओ “नेपाळमध्येही मोदी सरकारची मागणी” अशी कॅप्शन देऊन दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास…

आम्ही व्हिडीओमधील की-फ्रेम्स घेऊन रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ या वर्षी ऑगस्टमध्येदेखील समाजमाध्यमांवर अपलोड करण्यात आला होता.

हा व्हिडीओ फेसबुकवरदेखील शेअर करण्यात आला होता; ज्याचे श्रेय ‘एसकेएम इनसाईट’ला देण्यात आले होते आणि कॅप्शन आणि हॅशटॅगमध्ये सिक्कीमचा उल्लेख होता.

https://www.facebook.com/watch/?v=617592597749527

आम्हाला ‘एसकेएम इनसाईट’ या फेसबुक पेजवर ही रील सापडली.

https://www.facebook.com/reel/739890528881243

हा व्हिडीओ १२ ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आला होता.

https://www.facebook.com/share/v/1BWSuvRUet

आम्हाला सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केलेली पोस्ट आढळली.

https://www.facebook.com/share/p/15xcPtD6oD

हा व्हिडीओ ‘हर घर तिरंगा’ मोहिमेतील आहे.

आम्हाला एका फेसबूक पेजवर पोस्ट केलेले काही फुटेज आढळले…

https://www.facebook.com/share/p/1BK5YPsLSW

https://www.facebook.com/sdrai.sdrai.773/videos/4097060020534729

निष्कर्ष : सिक्कीममधील ‘हर घर तिरंगा’ मोहिमेतील एक जुना व्हिडीओ नेपाळमधील असल्याचा दावा करून शेअर केला जात आहे; जो खोटा आहे.