Viral Video Man Hanging From A Helicopter : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये एक माणूस हेलिकॉप्टरला लटकलेला दिसत होता. हा व्हिडीओ भारतातील बिहार राज्यातील असल्याचा दावा केला जातो आहे. मात्र, तपासणीदरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ भारताचा नसून केनियातील आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक युजर अनुज यादव याने हा व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर ““हेलिकॉप्टर उडायला सुरुवात झाली, तेवढ्यात एका अज्ञात माणसाने हेलिकॉप्टरला पकडले. त्यामुळे तो हेलिकॉप्टरसह वर जाऊ लागला. त्याने हा अजब स्टंट केल्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले” अशा दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला आहे.
https://www.facebook.com/watch/?v=2521053804962889
इतर युजर्स देखील अशाच दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
https://www.facebook.com/reel/1480321759690589
तपास
व्हायरल व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.
आम्हाला एक बातमी अहवाल सापडला, ज्यात व्हायरल व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स वापरले होते.
https://dantri.com.vn/doi-song/xin-di-nho-bat-thanh-nguoi-dan-ong-lieu-mang-du-len-truc-thang-20250418205717036.htm
या वर्षी एप्रिलमध्ये प्रकाशित झालेल्या बातमी अहवालात म्हटले आहे की, केनियामध्ये एका लग्ना समारंभात ‘लिफ्ट’ (राईड) न मिळाल्याने एका व्यक्तीने, हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना त्याच्या लँडिंग गियरला (उतरण्याच्या चाकांना) घट्ट धरून ठेवले आणि एकच गोंधळ निर्माण झाला. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी केनियातील रपोगी (Rapogi) गावातून एक हेलिकॉप्टर निघण्याची तयारी करत असताना ही घटना घडली होती.
‘द टेलिग्राफ’ (The Telegraph) ने वृत्त दिले की, त्या व्यक्तीची ओळख स्टीफन ओधियाम्बो औमा (Stephen Odhiambo Ouma, 28 years old) अशी आहे. त्याने यापूर्वी हेलिकॉप्टरमधील लोकांशी राईडसाठी विचारणा केली होती, पण, त्याची विनंती मान्य झाली नाही.
त्या वेबसाइटवर देखील हा व्हिडीओ एम्बेड (जोडलेला) केलेला होता.
आम्हाला ‘स्पॉट ऑन न्यूज’ (spot on news) च्या युट्युब पेजवर देखील या घटनेबद्दलची व्हिडीओ स्टोरी सापडली. हा व्हिडीओ ६ महिन्यांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.
आम्हाला आढळले की, अनेक वेबसाइट्सवर या घटनेबद्दलचे वृत्त प्रकाशित झाले होते.
https://www.telegraph.co.uk/world-news/2025/04/16/bizarre-moment-man-clings-to-helicopter-at-take-off-from-we
https://www.msn.com/en-ph/news/other/man-tries-to-ride-helicopter-before-clinging-on-to-it-as-it-takes-off/ar-AA1D6sS9?apiversion=v2&noservercache=1&domshim=1&renderwebcomponents=1&wcseo=1&batchservertelemetry=1&noservertelemetry=1
https://www.24h.com.vn/tin-tuc-quoc-te/kinh-hai-thanh-nien-kenya-du-cang-dap-truc-thang-giua-khong-trung-c415a1657895.html
आम्हाला फेसबुकवर देखील व्हायरल व्हिडीओमधील दृश्य मिळाली.
निष्कर्ष: हेलिकॉप्टरला लटकलेल्या एका माणसाचा केनियातील जुना व्हिडीओ भारतातील बिहारमधील अलीकडचा म्हणून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे.
