Cute viral video: रोड ट्रिप म्हटलं की कुटुंबात एक वेगळाच उत्साह असतो. गाडीतले स्नॅक्स, गाणी, हसणं–खिदळणं आणि प्रवासाचा आनंद घेणे. पण, आजकाल या रोड ट्रिपमध्ये एक नवीन ट्रेंड दिसून येत आहे. पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्यांइतकेच प्रेम देणे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये असेच काहीसे दिसते आहे.

सोशल मीडियावर फिरत असलेला हा व्हिडीओ एका रोड ट्रिपदरम्यान शूट करण्यात आला आहे. एका कुटुंबाने त्यांच्या पाळीव श्वानासाठी गाडीत बाळाच्या आकाराचा पाळणा बसवला आहे. एक संपूर्ण कुटुंब आपल्या पाळीव कुत्र्यासोबत प्रवासाला निघालेलं दिसतं. पण, सगळ्यात खास म्हणजे या कुत्र्यासाठी कारच्या मागच्या सीटमध्ये एक छोटासा क्युट पाळणा लावण्यात आला आहे. अगदी एखाद्या लहान बाळासाठी जसं पाळणा तयार करतात, तसंच नीट कापड, कुशन आणि आरामदायी जागेसह हा पाळणा बनवलेला आहे. पाळीव प्राण्यांप्रती असणाऱ्या प्रेम, काळजी आणि लाड यामुळे हा व्हिडीओ लोकांच्या हृदयात जागा बनवत आहे.

व्हिडीओमध्ये श्वान पूर्णपणे आरामशीरपणे झोपलेला दिसतो आहे. गाडी चालू असताना पाळणा हळूवारपणे हलतो आणि पाळीव प्राणी आनंदाने आजूबाजूच्या गोष्टींचे निरीक्षण करताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि निरागस हास्य पाहून कुणाच्याही चेहऱ्यावर हसू येईल. कुटुंबानं त्याला एखाद्या मुलासारखाच मान दिल्याचं दिसते आहे. कारण त्यांनी पाळण्याबरोबर उशी, छोटं ब्लॅंकेट आणि सुरक्षित बसण्यासाठी नीट जागा अशा सर्व गोष्टींची खबरदारी घेतलेली दिसते आहे.

पाहा व्हिडिओ

ही संपूर्ण कल्पना कुत्र्याला प्रवासादरम्यान आराम करण्यास मदत करण्यासाठी वापरली जाते आहे. हा व्हिडीओ पोस्ट होताच लोकांनी भरभरून रिअ‍ॅक्शन दिल्या. अनेक युजर्सनं लिहिलं की “आजकाल मालक पाळीव प्राण्यांची सोय लक्झरी तर फाईव्ह–स्टारपेक्षाही जास्त चांगली करतात!”, ” भारतीय कुटुंबं आपल्या प्राण्यांना खरंच मुलांसारखंच प्रेम देतात, हा व्हिडीओ त्याचं उत्तम उदाहरण आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इंस्टाग्राम @denuu97 अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर काहींनी मजेत म्हटलं, “आम्हालाही असा पाळणा हवा रोड ट्रिपसाठी!” काहींनी या आयडियाचं कौतुक करून म्हटलं की, पाळीव प्राण्यांच्या कम्फर्टचा इतका विचार करणं म्हणजे खरं प्रेम!” , ” श्वानासाठी कुटुंबाने दाखवलेले लाड” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.