Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे असतात. साधारणपणे सर्व मुले त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ असतात. आजकालची मुलं प्रत्येक गोष्ट पालकांसोबत शेअर करतात. त्यामुळे सोबतच मुलं पालकांसोबत मजा-मस्करी करायलाही मागेपुढे पाहत नाहीत तसेच काही त्यांची खूप चेष्टाही करतात. मात्र पूर्वी असं चित्र पाहायला मिळत नव्हतं.वडीलांचा प्रचंड धाक पाहायला मिळायचा. वडिलांकडे बघायचीही हिम्मत मुलांची होत नव्हती, दरम्यान आता काळ बदलला आणि वडिलांकडे एक मित्र म्हणून मूलं पाहू लागले. लहानपणी वडिलांच्या धाकात राहिलेल्या अशाच एका मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाप-लेकाच्या डान्सची सर्वत्र चर्चा होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजोबांनी पांढरा सदरा टोपी घातली आहे तर मुलानं शर्ट पँट घातली आहे. दोघंही यावेळी भन्नाट डान्स करत आहेत. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या गाण्यावर दोघाही थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.
तसेच बाप-लेकाची जुगलबंदी पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल. बाप-लेकाचं हे नात पाहून अनेकजण कौतूक करत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ jagtap5755 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, एक नंबर, आज मी पाहिलेली सर्वात सुंदर इंस्टाग्राम रील., वडिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच तुमच्या घराची श्रीमंती दाखवते., खूपच छान बापा समोर एन्जॉय कधीच कमी पडणार नाही साहेब तुम्हाला असाच आनंद जन्मोजन्मी असो असा आशीर्वाद देतो शेतकरी बुलढाणा जिल्हा, या पिढीत ही अशीच माणसे पाहिजे. खूप छान वाटत असे व्हिडिओ पाहून मी तर खूप वेळ पाहिला हा व्हिडिओ, जगातील सगळ्यात सुंदर व्हिडिओ आणि जगातील सर्वात श्रीमंत मुलगा, आई, बापाच्या चेहऱ्यावरचे हसू आणि समाधान हेच तुमच्या घराची श्रीमंती आहे, खूपच छान व्हिडिओ… खूप दुर्मिळ झालं आहे बाप लेकाचा असं नातं
© IE Online Media Services (P) Ltd