Premium

नोकरीवरून काढल्यानंतर घेत होता कामाचे अपडेट्स; संतापलेल्या कर्मचाऱ्याने बॉसचीच घेतली फिरकी, युजर्स म्हणाले, ‘अशा बॉसला ब्लॉक केलं…

सोशल मीडियावर बॉस आणि कर्मचाऱ्यांमधील चॅटचे अनेक स्क्रीनशॉर्ट व्हायरल होतात, काहीवेळा हे चॅट्स वाचून खूप हसायला येते. पण आता व्हायरल होणाऱ्या चॅट्समध्ये बॉसने नाही तर कर्मचाऱ्यानेच चक्क बॉसची फिरकी घेतली आहे.

Boss employee chat viral
बॉस कर्मचाऱ्यामधील व्हायरल चॅट (फोटो – freepik)

वर्क लाईफ बॅलेंस करणे आजकाल सर्वात मोठे चॅलेंज बनले आहे. अनेकांना कामाच्या ठिकाणी दररोज नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. यात जर कामावरचे सहकारी चांगले असतील तर थोडा आधार असतो, पण बॉसच कटकटी असेल तर अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यामुळे सोशल मीडियावरही अनेक युजर्स आपल्या वर्कलाइफमुळे निर्माण झालेली चिडचिड व्यक्त करत असतो. सध्या अशाच एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे जी आता युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. आत एक बॉस आपल्या कर्मचाऱ्याला आधी कामावरून काढून टाकतो आणि नंतर त्याच्याकडून कामाचे अपडेट्स घेत असतो, त्यावर कर्मचारी असा काय संतापतो आणि तो बॉसचीच उलटी फिरकी घेण्यास सुरुवात करतो. Reddit वर या बॉस आणि कर्मचाऱ्यामधील चॅटचे स्क्रीन शॉर्ट व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधी नोकरीवरु काढले, मग घेतल होता कामाचे अपडेट

व्हायरल होणाऱ्या चॅटच्या स्क्रीनशॉर्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, कर्मचाऱ्याचा एक्स बॉस इन्व्हेंटरीवरील अपडेटबद्दल विचारत असतो. या प्रश्नावर गोंधळलेल्या कर्मचारी बॉसलाच विचारतो की, तुम्ही मला कामावरून काढले आहे की नाही. ज्यावर बॉस उत्तर देतो, होय….या उत्तरानंतर बॉस पुढे म्हणतो की, तुम्ही इन्व्हेंटरी आणि रविवारची ऑर्डर तयार केली आहे. ती कुठे आहे, असा प्रश्न मला पडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 18:13 IST
Next Story
ऋतुराज गायकवाड व होणाऱ्या बायकोचा धोनीसह फोटो; फॅन्सना दिसला ‘हा’ भन्नाट प्रकार; म्हणाले, “म्हणून तू स्टार”