Funny video: सोशल मीडिया म्हणजे आजच्या काळातील सर्वात मोठं मनोरंजनाचं साधन. दिवसाच्या धावपळीत, ताणतणावात लोकांना काही सेकंद तरी हसवणारे व्हिडीओ इथे क्षणात व्हायरल होतात. त्यातही प्रँक आणि मनोरंजक व्हिडीओ तर लोकांच्या आवडीचे झाले आहेत. असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या चर्चेत असून, तो पाहून नेटिझन्स अक्षरशः पोट धरून हसत आहेत. साधेपणात गुंडाळलेला हा प्रँक इतका प्रभावी ठरला आहे की, ज्यांनी व्हिडीओ पाहिला ते सगळेच त्याच्या कॉमेडीची दाद देत आहेत.

हा व्हिडीओ एका माणसाच्या भन्नाट प्रँकवर आधारित आहे. तो हातात एक कटोरा घेऊन लोकांना सांगतो की, तो “चरणामृत” वाटतोय. दिसायला अगदी शांत, साधं आणि भक्तिभावानं भरलेलं दृश्य… पण, खरी गोष्ट काहीतरी वेगळीच असते. कटोऱ्यात “चरणामृत” नसून सरळ लिंबूरस असते. लोक श्रद्धेने पुढे येतात आणि या श्रद्धेच्या आड दडलेला हा भन्नाट प्रँक सुरू होतो.

लोक एकामागून एक त्या माणसाकडून “चरणामृत” घेतात, पण पहिला घोट तोंडात जाताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलतात. कुणाच्या भुवया अचानक वर जातात, कुणाच्या डोळ्यांत पाणी येतं, तर कुणी घोट पूर्ण पिण्याआधीच खोकायला लागतो. काही जण तर सरळ आसपास पाणी शोधू लागतात.

पाहा व्हिडिओ

त्यांच्या या नैसर्गिक आणि रिअॅलिस्टिक रिअॅक्शन्स पाहताना हसू आवरतच नाही. कुणी आश्चर्याने थक्क होऊन बघत राहतं, तर कुणी चव समजत नसल्यामुळे गोंधळलेला चेहरा करतो. अगदी “आत्ता मी नेमकं काय प्यायलं?” असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आणि हाच भाग नेटिझन्सना सर्वाधिक मजेदार वाटतो.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी धमाल प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. कुणी मजेत लिहिलं, “भाईने भक्तांना थेट विटामीन सीचा भारी डोस दिला!”, तर एकाने म्हटलं, “हे चरणामृत नाही, आयुष्यातील सगळ्यात खट्टा अनुभव आहे.” आणखी एकाने तर हसत-हसत लिहिलं, “हा माणूस नक्की नर्काच्या व्हीआयपी सीटवर जाईल!” इतकंच नाही, काहींनी या व्हिडीओला “वर्षातील सर्वात मनोरंजक प्रँक” अशी पदवीही दिली. लोकांचे बदललेले चेहरे, त्यांचे रिअल रिअॅक्शन्स आणि प्रतिक्रियांमधील अशा भन्नाट प्रतिक्रिया; या सगळ्यांमुळे व्हिडीओचं मनोरंजन आणखी वाढलं आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात असे छोटे-छोटे मजेदार व्हिडीओ लोकांना काही क्षण तरी हसवतात, म्हणूनच हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरतोय.