Viral video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक मजेदार व्हिडिओ पाहिले असतील, काही व्हिडिओंनी तुम्हाला आश्चर्यचकित केले असेल. काही व्हिडिओंनी तुम्हाला त्रास दिला असेल तर काही व्हिडिओ तुमच्या कल्पनेच्या पलीकडे गेले असतील. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो तुमच्या आणि आमच्या कल्पनेच्या पलीकडे गेला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक मजूर घराला रंगरंगोटी करत असताना अचानक त्याच्या जवळ ठेवलेली शिडी आपसूकच हलू लागली, जणू तो मजुराला सांगत आहे की तू ओव्हरटाईम कर, मी जातो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती घराच्या बाहेर उभी राहून घराला रंगरंगोटी करत असल्याचे दिसत आहे, पण तिथे अचानक असे काही घडते की त्या व्यक्तीलाही आश्चर्याचा धक्का बसतो. तुम्हीही हे दृश्य पाहिल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. असे होते की त्या व्यक्तीच्या जवळ ठेवलेली शिडी स्वतःहून हलू लागते, जे पाहून तो आश्चर्यचकित होतो आणि हसायला लागतो. अशा वेळी तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हे संपूर्ण दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. इंटरनेटवरील अशा प्रकारचा हा पहिलाच व्हिडिओ आहे, ज्यामध्ये लाकडापासून बनवलेली शिडी कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःहून हलू लागते. व्हिडिओमध्ये पडोसन चित्रपटातील “मैं चली में चली देखो प्यार की गली” हे गाणे वाजवण्यात आले आहे. शिडीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडी थांबताच अवघ्या ३ सेकंदात मोबाईल लंपास; प्रवाशांनो खिडकीजवळचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ सोशल मीडियावर लाफ्टरकलर्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर व्हिडिओला ७ हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत युजर्सही यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले… अरे भाऊ, हा चमत्कार आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… धावा, धावा, भूत आले आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…”जेवढा पगार तेवढंच काम”

काही वेळा लोकांना पगार कमी असतो आणि काम मात्र जास्त असतं. अशावेळी काहीजण हे काहीही न बोलता करत राहतात तर काहीजण याविरोधात आवज उठवतात. असाच काहीचा हा प्रकार असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.