G20 Summit Art Exhibition: G20 शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या नेत्यांच्या जोडीदारांच्या (पती व पत्नी) स्वागतासाठी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) येथे भारताच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या अनेक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विविध देशांच्या प्रथम नागरिक (फर्स्ट लेडी/फर्स्ट जेंटलमॅन) यांना या वस्तू खरेदी सुद्धा करता येणार आहेत. या प्रदर्शनात महिलांसाठी सलवार सूट, मातीची भांडी आणि दागिने ठेवण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिखर परिषदेत, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. एनजीएमएमध्ये, जम्मू आणि काश्मीरमधील एका प्रदर्शकाने एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, भारतातील विविध राज्यांमधील कला एकत्रित करून साकारलेल्या वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.

G20 Summit: प्रदर्शनात कोणत्या वस्तू असणार, त्याच्या किमती काय?

१) भारताच्या हस्तकलेचे प्रतीक असणाऱ्या हाताने पेंटिंग केलेली पश्मिना शाल, कोलकाता येथून आलेल्या भरतकाम केलेल्या वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. यातील सर्वात महाग पश्मिना साडीची किंमत आठ लाख रुपये आहे.

२) प्रदर्शनातील एका सलवार सूटची किंमत २.५ लाख आहे. त्याचप्रमाणे, नटराजाची मूर्ती $6,000 (रु. ४.९८ लाख) किमतीची आहे.

३) गुजरातच्या पाटण प्रदेशातून पारंपारिकपणे डबल इरकत विणण्याच्या तंत्राचा वापर करून बनवलेल्या पाटण पटोला साड्याही प्रदर्शनात आहे.

४) एनजीएमएमध्ये साडीचा स्टॉल लावणाऱ्या सुनील सोनी यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “१.३५ लाखापासून ते ३.५ लाखांपर्यंत जाणाऱ्या विंटेज पटोला साड्या या ९०० वर्षांपासून सुरु असलेल्या पारंपरिक विणकाम कलेचा नमुना आहेत. एक पाटणा पटोला साडी बनवायला साधारण साडेसात महिने लागतात.

हे ही वाचा<< “देशाची गरिबी लपवून… “, G20 चे बॅनर्स पाहून तुमचाही होईल संताप! मोदींचा चेहरा असलेल्या पोस्टरची वेगळी बाजू पाहा

दरम्यान, G20 नेत्यांचे जोडीदार उद्या, ९ सप्टेंबर रोजी ‘रूट्स अँड रूट्स: पास्ट प्रेझेंट अँड कंटिन्युअस’ या भारताच्या ‘सभ्यतावादी पराक्रम आणि कलात्मकते’ला समर्पित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी NGMA ला भेट देतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G20 summit art exhibition with 8 lakhs pashmina shawl and three lakh priced saree to show spouses of biden sunak in delhi svs