Gautami patil viral video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोझचे सेल्फी अपलोड करण्याची क्रेझ सुरु आहे.सेल्फी काढायला कुठलंही कारण लागत नाही. आपल्या आवडत्या हीरोचा फोटो किंवा ऑटोग्राफ मिळवण्यासाठी चाहते काय काय नाही करत. आता फोटो किंवा ऑटोग्राफचा जमाना तसा राहिला नाही. चाहत्यांना सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढायची असते. त्यात जर गौतमी पाटील असेल तर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यत महिला पुरुष सगळेच तिचे चाहते आहेत. लावणी डान्सर गौतमी पाटीलचे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आपल्या भन्नाट डान्सने सर्वांना स्वतःच्या तालावर थिरकायला लावणारी गौतमी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दरम्यान गौतमीसोबत सेल्फी घेणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लावणी कलाकार गौतमी पाटीलचं नाव आता किमान महाराष्ट्रासाठी तरी नवं नाही. अर्थात तिच्या नावाची असणारी ओळख प्रत्येकासाठी वेगळी आहे. कोणासाठी ती सोशल मीडियावर व्हिडीओतून व्हायरल होणारी मुलगी आहे, कोणासाठी लावणी कलाकार, तर कोणासाठी एक अशी मुलगी, जिच्या फॉलोअर्सचा आकडा थक्क करुन जातो. लावणी आणि त्याभोवती फिरणाऱ्या असंख्य कारणांमुळं चर्चेत असणारी गौतमी काही दिवसांपूर्वीच तिच्या एका कार्यक्रमादरम्यान, परफॉर्मन्स सुरु असताना केलेल्या अश्लील हावभावांमुळे अडचणीत सापडली होती. आरोप प्रत्यारोप, पत्रकार परिषद आणि स्पष्टीकरणांनंतर कुठे हा वाद निवळला. पण, गौतमीच्या नावाची चर्चा मात्र दुपटीनं वाढली. दरम्यान आता गौतमी नाही तर गौतमीसोबत सेल्फी घेण्यासाठी आग्रही असणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गौतमी एका ठिकाणी आली असता तिच्या चाहत्यांना तिच्या भोवती गर्दी केली आहे. सर्वजण तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी धक्काबुक्की करत आहे. या चाहत्यांमध्ये एक महिलाही आहे जिच्याजवळ अवघ्या काही महिन्यांचं बाळ आहे. ते बाळ खूप रडत आहे मात्र त्या महिलेनं आपल्या बाळाला गौतमीच्या हातात दिलं आणि ती मात्र सेल्फी काढण्यात व्यस्थ झाली. यावेळी हे लहान लेकरू खूप रडताना दिसत आहे. हे पाहून गौतमीही बाळाला स्वत:कडे घेण्यासाठी बाळाच्या आईला सांगते मात्र ही महिला बाळाकडे लक्ष देता गौतमीसोबत सेल्फी काढण्यात व्यस्थ असल्याचं दिसतंय. महिलेचा हा हलगर्जीपणा पाहून आजूबाजूचे लोकंही संतापले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच

गौतमीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर marathi_memer_2.0 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर स्वत:चं लेकरू रडतंय पण गौतमीसोबतचा फोटो महत्त्वाचा आहे असं लिहलं आहे. या व्हिडीओला लाईक्स अन् व्ह्युजही लाखोंमध्ये गेले आहेत तर नेटकरीही महिलेवर टीका करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil viral video woman busy in taking selfie with gautami and her child crying netizens react srk