Raksha Bandhan 2025 Viral Video: रक्षाबंधन जवळ आलंय… आणि सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्ही हसाल आणि विचारातही पडाल. कारण यात बहिणींना भावाला भेट देण्याचा असा सल्ला दिला जातोय, जो ऐकताच कुणीही गोंधळून जाईल. म्हणे, जर रक्षाबंधनाच्या दिवशी, तेही मंगळवारी, भावाला हा रंग असलेली भेट दिलीत, तर तुमचं नशीब चक्क फुलणार आणि घरात येणार भरभराट! हा दावा ऐकून अनेक जण गंमत म्हणून घेतायत, पण ज्योतिषशास्त्र मानणाऱ्यांना यात काहीतरी खास संकेत दिसतोय. नेमकं काय आहे या व्हिडीओचं गुपित? वाचा आणि तुम्हीच ठरवा…

रक्षाबंधन अगदी समीप आलंय आणि सोशल मीडियावर या सणाचा माहोल रंगला आहे. भावा-बहिणींच्या आठवणी, गमतीजमती, रील्स आणि व्हायरल व्हिडीओंनी इन्स्टाग्राम आणि फेसबुक गजबजलंय. अशाच व्हायरल कंटेंटपैकी एक मजेदार व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतोय, कारण यात बहिणींना भावाला “एक खास भेट” देण्याचा सल्ला दिला जातोय… आणि ती भेट लाल रंगाची असावी!

होय, व्हिडीओनुसार जर बहिणीने मंगळवारी भावाला लाल रंगाची भेटवस्तू दिली, तर तिच्या आयुष्यात भरभराट आणि शुभ काळ येईल. हा व्हिडीओ मीमच्या स्वरूपात बनवून इन्स्टाग्रामवरील manoj.c.v.s आणि iharrysatwani या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यात एका पॉडकास्टमधील महिला सांगते, “भावासोबतचे संबंध चांगले ठेवा, त्याला चांगली भेटवस्तू द्या… आणि मंगळवारी लाल रंगाचं गिफ्ट दिलंत तर तुमचं नशीब फुलणार, हा उपाय १००% काम करतो!”

या व्हिडीओने हशा आणि कुतूहल दोन्ही पेरलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये एका नेटकऱ्याने लिहिलंय, “मी बहिणीकडे आता लाल रंगाची थार मागणार,” तर दुसऱ्याने गमतीत म्हटलं, “मी आधीच भावाला लाल रंगाचा शर्ट भेट दिला.”

खरंतर ही व्हिडीओ क्लिप प्रत्यक्षात एक मीम म्हणून बनवण्यात आली असून, ती एका पॉडकास्टमधून संपादित (Edit)  करून तयार केली गेली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ही क्लिप जोरदार व्हायरल होत आहे. यात मुलाखत देणारी एक महिला बहिणींना भावाला भेटवस्तू देण्याचा अनोखा सल्ला देताना दिसते.

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार हा मंगळ ग्रहाला समर्पित असतो आणि मंगळाचा रंग लाल मानला जातो. लाल रंग ऊर्जा, शक्ती आणि आत्मविश्वासाचं प्रतीक असल्याने या दिवशी तो रंग भेट देणं शुभ मानलं जातं, यामुळे बजरंगबली हनुमानाची कृपादृष्टी लाभते असा विश्वास आहे. मात्र, हा दावा केवळ श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे; वैज्ञानिक आधार नसल्याने याला अंधश्रद्धा न मानता फक्त एक सांस्कृतिक गंमत म्हणून घ्यावं, असंही तज्ज्ञ सांगतात.

येथे पाहा व्हिडीओ

तर, या रक्षाबंधनाला तुम्ही भावाला लाल रंगाचं गिफ्ट देणार का? आणि खरंच त्यानंतर काही बदल जाणवला, तर ते अनुभव शेअर करायला विसरू नका!

(डिस्क्लेमर : या बातमीतील माहिती ही सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. लोकसत्ता कोणत्याही प्रकारच्या दाव्याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.)