Gorilla Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात, जे अनेकदा मजेशीर किंवा हास्यास्पद असतात. पण काही व्हिडीओ असे असतात की, जे काळजाला भिडतात, प्राण्यातल्या चांगल्या गुणांचे दर्शन घडवतात. सध्या एका गोरिलाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात माणूस आणि प्राण्यांमधील एक अनोखे व भावनिक नाते दिसून येते. हा व्हिडिओ एका प्राणिसंग्रहालयाचा आहे. त्यामध्ये एक महिला तिच्या लहान मुलाला घेऊन प्राणिसंग्रहालयात फिरण्यासाठी घेऊन आली होती. यावेळी महिला तिच्या चिमुकल्याला गोरिला राहत असलेल्या तारेच्या कुंपणात उभी करते. चिमुकल्याला पाहताच गोरिला त्याच्याजवळ येतो आणि तो असे काही करतो की, ते पाहून तुम्हालाही प्राण्यांमधील माणुसकीचे दर्शन घडेल.

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, प्राणिसंग्रहालयातील गोरिलाला राहण्यासाठी बनविलेल्या कुंपणात महिला आपल्या चिमुकल्याला उभी करते. यावेळी गोरिलाची नजर चिमुकल्याकडे पडते आणि तो हळूहळू त्याच्याजवळ येतो. यावेळी चिमुकला पाहून घाबरू नये म्हणून तो पुरेपूर प्रयत्न करतो.

व्हिडीओच्या सुरुवातीला असे दिसते की, महिला तिच्या चिमुकल्याला घेऊन गोरिलाच्या कुंपणाजवळ उभी आहे. ती कदाचित फोटो काढण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी थोडा वेळ चिमुकल्याला कुंपणाच्या रेलिंगजवळ उभे करते. यावेळी गोरिला थोडा दूर बसलेला असतो आणि अचानक त्याची नजर त्या चिमुकल्यावर पडते. त्यानंतर गोरिला हळूहळू त्या चिमुकल्याजवळ जातो. तिथे उपस्थित असलेले लोकही हे दृश्य पाहून क्षणभर घाबरतात. कारण- गोरिला हा एक शक्तिशाली प्राणी आहे. त्यामुळे तो मुलाजवळ गेल्याने कोणालाही भीती वाटणे साहाजिक आहे. पण, त्यानंतर असे काही घडते की, ते सर्वांच्या कल्पनेपलीकडचे होते.

गोरिला चिमुकल्याजवळ पोहोचतो आणि प्रथम त्याच्याकडे काळजीने पाहतो. नंतर तो त्याला हातांनी खूप हळुवारपणे मुलाला उचलतो. त्यातून असे दिसते की, त्याला या छोट्याशी जीवाची किती काळजी आहे, मग गोरिला मुलाला उचलून घेत महिलेकडे जातो आणि त्याला अगदी हळुवारपणे आईच्या कुशीत देतो. हे पाहून महिला प्रथम आश्चर्यचकित होते; पण नंतर हसत हसत तिच्या चिमुकल्याला हातात घेते आणि त्याच्याकडे हात हलवून गोरिलाचे आभार मानते.

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात लोक गोरिलाच्या कृतीचे खूप कौतुक करीत आहेत. हा व्हिडीओ elwoodshouse नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये गोरिलाच्या बुद्धिमत्ता, संवेदनशीलता आणि मानवतेचे कौतुक केले. एका युजरने लिहिले, “कधी कधी प्राणी माणसांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात.” दुसऱ्याने लिहिले, “गोरिलाचे हृदय माणसांपेक्षा मोठे निघाले.”