Viral video: लग्नात बँड बाजाचा गजर वाजावा, शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या वऱ्हाड्यांनी डीजेच्या तालावर नाचावं आणि सोहळा शुभ मंगल सावधानच्या मंगलाष्टकांनी दणाणून जावा, अशी प्रत्येक नवरा-नवरीची इच्छा असावी. पण, भर लग्नसोहळ्यात काही गालबोट लागलं, तर आनंदाच्या क्षणी डोळ्यांतून अश्रू तरळायला वेळ लागत नाही. असंच काहीसं एका लग्नसोहळ्यात घडलं आहे. भर मंडपात असलेल्या वऱ्हाड्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहून नवरा नवरीसह त्यांच्या कुटुंबीयांना धक्काच बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 लग्नामध्ये एखादी गोष्ट कमी झाल्यावर मानापमानाचे नाट्य नेहमी होत असते. कधीकधी यावरुन वाद होऊन लग्नही मोडल्याचे तुम्ही ऐकले असेल. हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नामध्ये दोन गटात ही हाणामारी होत आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांना खुर्च्या फेकून मारत आहेत. कुणी खुर्च्या अंगावर टाकत आहे तर कुणी डोक्यात खुर्टी फेकून मारत आहे. ही भांडणं नवरदेवाच्या मित्र आणि भांवडांमध्ये होत असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप या हाणामारीच कारण समोर आलेलं नाहीये. यावेळी उपस्थित असलेल्या इतर पाहुण्यांनी या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र हे तरुण कुणाचंही एकायला तयार नाही. यावेळी लग्नात उपस्थित असलेल्यापैकी कुणीतरी याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि आता तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> IND vs AUS: फायनलचा थरार बघायला आलेल्या अनुष्का शर्माच्या ड्रेसची पुन्हा चर्चा; पाहा वर्ल्ड कप लूकची किंमत काय?

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @Arhantt_pvt या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom bride shocked after seeing guests fight in wedding ceremony marriage video goes viral on internet srk