Wedding viral video: लग्न म्हटलं की आनंद, गोंधळ, मजा आणि काही भन्नाट किस्से हे सगळं तर असतंच. भारतीय लग्नांमध्ये प्रत्येक क्षणी काहीतरी हटके घडत असतं आणि तेच क्षण नंतर व्हिडीओच्या रूपात सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशाच एका लग्नातील हास्यास्पद पण थोडा गोंधळलेला प्रसंग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका लग्नात नजर उतरवताना नवरदेवाने नोटा हवेत उडवल्या आणि त्या नोटांसाठी मुलांची अक्षरशः पळापळ सुरू झाली.

हा व्हायरल व्हिडीओ एका पारंपरिक लग्नातील मजेशीर प्रसंग दाखवतो. नवरीची नजर उतरवण्यासाठी नवरदेवाने शगुनाच्या नोटांचा वापर केला आणि नंतर त्या नोटा सगळ्यांसमोर हवेत उडवल्या. लग्नाच्या माहोलात असा सीन बाहेरून पाहायला जितका साधा वाटतो, तितकाच तो तिथे उपस्थितांच्या नजरेतून पाहिला की भलताच मनोरंजनाचा पेटारा उघडतो.

व्हिडीओमध्ये दिसतं की, नवरदेव नवरीच्या चेहऱ्याजवळ काही नोटा फिरवून तिची नजर उतरवतो. त्या दोघांच्या चेहऱ्यावर हसू असतं आणि सगळं वातावरण प्रेम, गोडवा आणि उत्साहाने भरलेलं असतं. पण, पुढच्याच क्षणी नवरदेव त्या नोटा हवेत उडवतो आणि तिथून सुरू होते खरी धमाल!

हवेत उडवलेल्या नोटा पाहताच तिथे उभे असलेली लहान मुलं अक्षरशः धावत सुटतात. नोटांसाठी एकमेकांना ढकलणं, पुढे जाण्याचा प्रयत्न करणं… असा गोंधळ सुरू होतो. या धावपळीत नवरीचा तोल जाऊ लागतो आणि ती मागे सरकते, पण सुदैवाने तिच्या अगदी जवळच उभी असलेली एक व्यक्ती तिला त्वरित धरते आणि मोठा अपघात टळतो.

पाहा व्हिडिओ

हा सीन इतका अचानक घडतो की पाहणारेही क्षणभर दचकतात आणि मग मात्र हसायला लागतात. अशा प्रकारच्या धावपळीमध्ये लग्नातील लोक काय करणार याचा नेम कधीच लागत नाही. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट होताच हजारो व्युज आणि शेकडो मजेशीर प्रतिक्रिया यावर येऊ लागल्या. लोकांनी लिहिलं की, “प्रत्येक लग्नात अशी मुलांची टोळी असतेच, जी नोटा किंवा भेटीसाठी पळतेच!” तर एका युजरनं मस्करीत लिहिलं, “नवरदेवाने नोटा उडवल्या नाहीत तर मुलांना कंटाळा येतो बहुतेक.”

काहींनी नवरीचा तोल गेल्याचं पाहून चिंता व्यक्त केली, तर अनेकांनी नवरदेव–नवरीवर प्रेमाने शुभेच्छांचा वर्षाव केला. “ही जोडी अशीच हसत-खेळत राहो,” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या.