कॅलेंडरवर फक्त काही तारखा अशा आहेत ज्या संख्यात्मकदृष्ट्या अत्यंत दुर्मिळ आहेत. अशा तारखांची अचूकता सहसा दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर येते. आज असाच एक दिवस आहे. आजची २२/०२/२०२२ ही तारीख केवळ दुर्मिळ नाही तर, दुप्पट दुर्मिळ आहे. याच कारण म्हणजे ही तारीख पॅलिंड्रोम आणि अँबिग्राम दोन्ही आहे. याचा अर्थ कोणीही ते पुढे, मागे आणि वरच्या बाजूला त्याच प्रकारे वाचू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२२/०२/२०२२ ब्रिटीश फॉरमॅटमध्ये लिहिल्यास, तारीख पॅलिंड्रोम आणि अँबिग्राम बनते, जो एक नमुना विशेष आणि अत्यंत दुर्मिळ आहे. तारखा पॅलिंड्रोम असणे असामान्य नाही. उदाहरणार्थ, अमेरिकन फॉरमॅट – २/२०/२०२२ मध्ये लिहिले असल्यास २० फेब्रुवारी २०२२ देखील एक होऊ शकतो.

(हे ही वाचा: ‘या’ व्हायरल फोटोत दडलेला आकडा तुम्ही सांगू शकता का? ९९ टक्के लोक ठरले अपयशी)

ही तारीख अनेक प्रकारे साजरी केली जात आहे. ब्रँड आणि कंपन्या खाद्यपदार्थ आणि उत्पादनांवर डील्स, ऑफर करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी किंवा आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी ही चांगली तारीख आहे.

(हे ही वाचा: तुफान वादळात लँडिंग करताना कॉकपिटमधलं थरारक दृश्य दाखवणारा Video Viral)

ही दुर्मिळ तारीख नेटीझन्सने साजरी करण्यास सुरुवात केली आहे आणि याविषयीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy twosday 22 2 2022 today date is special know the reason ttg