सोशल मिडिया मोठ्यापासून लहान मुलंपर्यंत अनेकांचे डान्स व्हिडिओ व्हायरल असतात. काही लोक डान्स करायला आवडतो म्हणून आवर्जून विविध गाण्यावर डान्स करत व्हिडिओ करतात. नुकताच २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला ज्यानिमित्त विविध शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अशाच एका कार्यक्रमात काही चिमुकल्यांना डान्स केला आहे ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकल्यांचे दिग्गज कलाकार दादा कोंडके यांच्या गाण्यावर डान्स केला आहे. मुलांनी दादा कोंडके यांच्यासारखी वेषभूषा परिधान केली आहे. डोक्यावरील पांढरी टोपी आडवी घातली आहे तर शर्ट आणि हाफ पँट घातली आहे. हाफ पँटची नाडी खाली लटकताना दिसत आहे. चिमुकल्याच्या चेहऱ्यावर काळ्या मिशा रेखाटल्या आहेत. मुलींनी नऊवारी साडी परिधान केलेली आहे. अशा चार मुलांच्या जोड्या बनवल्या आहे आणि सर्वजण हिल हिल पोरी हिला या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सर्वजण छान डान्स करत आहे पण सर्वांमध्ये एक चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डान्स करताना चिमुकला रडत आहे. रडत रडतच हा चिमुकला डान्स करत आहे. एवढंच काय तो एवढा रडत आहे तरी डान्सची एकही स्टेप विसरलेला नाही. हे पाहून नेटकऱ्यांना चिमुकल्याचे कौतुक वाटत आहे.

येथे पाहा फोटो

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर wonderful_memories12 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करतान कॅप्शनमध्य लिहिले आहे की, “घाबरून वैतागलेला दादा कोंडके” व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून चिमुकल्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
एकाने कमेंट केली की, “एवढा रडतोय पण डान्स स्टेप विसरला नाही”

दुसरा म्हणाला की, “हाडाचा कलाकार आहे, काही असो स्टेप विसरला नाही.”

तिसऱ्याने कमेंट केली की, “एवढ्या टेन्शनमध्ये एकही स्टेप विसरला नाही. भावाने मनापासून प्रॅक्टिस केली होती, एक नंबर भावा”

चौथा म्हणाला, वा रे पठ्ठ्या, रडला पण स्टेज सोडून नाही गेला वाघ, सलाम बाळा तुला”

गाण्यातील “का सतावितोय मला” हे बोल आणि चिमुकल्याची अवस्था पाहून एकाने लिहिले की, “कोणी बरं एवढं सतावले असेल याला”

चिमुकल्याचा निरागसपणाने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. स्टेजवर गेल्यानंतर त्याला रडू आले तरी त्याने हार मानली नाही. रडत रडक का असेना पण डान्स केला याचे नेटकऱ्यांना विशेष कौतुक वाटत आहे. चिमुकल्याच्या वागण्यातून आपल्याया हीच शिकवण मिळते आहे की, काहीही झाले तरी हाल मानू नका. नेहमी परिस्थितीचा सामाना करावा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He is real artist little boy cried but he didnt forget to dance dada kondkes style dance viral video snk