आजी आणि नातवडांच नातं हे अत्यंत निर्मळ आणि निखळ प्रेमाने भरलेलं असतं. आजीचा नातवडांवर जितका जीव असतो तितका कोणावरचं नसतो. गावी राहून शेत सांभाळणारी आजीला नेहमी असते ओढ असते ती नातवंडाच्या गावी येण्याची. नातवंड जेव्हा गावी येतात तेव्हा त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे तिला होतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कोकणातल्या आजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये गावी आलेल्या नातंवडाला पाहून आजीचा आनंद गगनात मावेना झाला आहे. हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून लोक भावूक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ ajinkyapashte8462 नावाच्या अकाउंटवर व्हायरल होत आहे. “मुंबईवरून गावाला गेल्यावर तिला होणारा आनंद” असे कॅप्शन व्हिडीओवर दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना, “तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहा” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. एका नातवडांने आपल्या आजीचा व्हिडीओ शूट करून पोस्ट केल्याचे व्हिडीओ पाहून लक्षात येते.व्हिडीओमध्ये एका कोकणातले एक छोटसं घर दिसत आहे. घराच्या दरवाज्यात एक लहान मुलगी आणि आजी उभी आहे. मुंबईवरून आलेल्या नातवडांला पाहून आजी सरसर पायऱ्या चढत कट्ट्यावर येते. नातडवांडाच्या जवळ जाऊन त्याला प्रेमाने कुरवाळते आणि त्यानंतर तिच्या चेयहऱ्यावर जे गोड हसू येते ते खरंच लाखमोलाचं आहे. नातंडवाडांना पाहून आजीला झालेला आनंद हा खरचं शब्दात न मांडता येणारा आहे. आजीचा हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या आजीची आठवण आली.

हेही वाचा – “खबडक खबडक घोडोबा…”; खेळण्यातील चाक असलेला घोडा कसा तयार केला जातो? पाहा फॅक्टरीतील Viral Video

व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एकाने लिहिले,” निखळ प्रेम, एक सर्वात सुंदर स्नेहभाव ,आपुलकी आणि अपार ममतेच नात म्हणजे आजी” तर दुसऱ्याने लिहिले की, “हा व्हिडीओ पाहून माझ्या डोळ्यात अश्रू दाटले. माझी आजी ९६ वर्षाची आहे पण आजही घरी गेले की माझं काय करू आणि काय नको असं होतं तिला. आई रेणुकामाता तिला उदंड आरोग्य देवो”

तिसा व्यक्ती म्हणाला, “भावा डोळ्यात पाणी आले रे माझी आजी पण अशीच आहे साधी भोळी” तर चौथा व्यक्ती म्हणाला, “नशीबवान असतात ते ज्यांना आजीच प्रेम मिळतं”

हेही वाचा – गॅसवर नव्हे कुकरच्या वाफेवर बनवली गरमा गरम कॉफी; विक्रेत्याचा हटके जुगाड, पाहा Viral Video

पाचवा व्यक्ती म्हणाला, “अगदी असंच माझी आजी पण वाट बघायची पण ती आता नाही. पूर्ण ७ महिने झाले तिला जाऊन, आजी तुझी आठवण येते” सहावा व्यक्ती म्हणाला, “हा निरागस चेहरा आहे आजीचा..ही आपली शेवटची पिढी .. आता अशी माणसे बघायला मिळत नाही”

आणखी एक जण म्हणाला की, “निर्मळ, निरागस,निस्वार्थ प्रेमाने ओसंडून वाहणारी नदी म्हणजे आजी, आजच्या व्यवहारिक जगातील ती अनमोल रत्न आहे, नेहमी तिची काळजी घ्या. नशीबवान आहत हा अनमोल ठेवा जपून ठेवा.” तर एकाने सांगितले ,”हेच तर आहे कोकणातील स्वर्ग. अशी ओढ असते माणसांची”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart touching video of grandmother joy and love for grandson who came from mumbai to village snk