Viral video: सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे.

कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लखनऊच्या कैसरबागमध्ये एका हृदयद्रावक घटनेत, पार्कमधील उघड्या ट्रान्सफॉर्मरमधून क्रिकेट बॉल उचलताना एका ७ वर्षांच्या मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.या मुलाच्या दुःखद मृत्यूमुळे स्थानिक लोक स्तब्ध झाले आहेत आणि विशेषतः पार्कमध्ये उघड्या मृत्यूच्या सापळ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत आहेत. ट्रान्सफॉर्मरजवळून चेंडू काढण्यासाठी पाठवण्यात आले तेव्हा मुलगा क्रिकेट खेळत होता. चेंडू उचलत असताना विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला.

७ वर्षांच्या मुलाला विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याने उद्यानाजवळ उपस्थित असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. व्हिडीओमधला आक्रोश पाहून तुमचंही काळीज पिळवटेल.

पाहा व्हिडीओ

स्थानिकांचा प्रशासनावर आरोप

ट्रान्सफॉर्मरजवळ जमलेल्या आणि मृत मुलाला वाचवणाऱ्या स्थानिकांच्या आक्रोशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. नेटकरीही प्रशासकांवर आरोप करत आहेत आणि मुलांच्या उद्यानात उघड्या असलेल्या अशा ट्रान्सफॉर्मरबाबत निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.हा व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन पुन्हा शेअर केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “लखनऊच्या कैसरबाग परिसरात, क्रिकेटचा चेंडू घेण्यासाठी गेलेल्या सुमारे सात वर्षांच्या मुलाचा ट्रान्सफॉर्मरला चिटकून मृत्यू झाला!!”

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

एकानं म्हंटलंय, “त्यांचा निष्काळजीपणा अन् सर्वसामान्यांचा मृत्यू.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने सरकारवर ‘मृत्यूचा व्यापारी’ असल्याचा आरोप केला. “कुंपण नाही, इशारा देणारे फलक नाहीत, सुरक्षा उपाययोजना नाहीत. स्मार्ट सिटीच्या पोकळ दाव्यांमध्ये, प्रत्येक रस्त्यावर आणि परिसरात विजेच्या तारा मृत्यूसारख्या लटकत आहेत, उघडे ट्रान्सफॉर्मर आहेत आणि पावसाळ्यात विद्युत प्रवाह पसरवणारे सरकारी दुर्लक्ष! ही निष्पाप मुले किती काळ सरकारच्या अपयशाची किंमत त्यांच्या जीवाने चुकवत राहतील?” अशी टीका एका व्यक्तीनं केलीय.