childcare: अनेकदा लहान मुलं खेळाताना अजानतेपणी अशा काही गोष्टी करतात की, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. कधीकधी तर या मुलांचा जीवदेखील धोक्यात येतो. अशा अनेक घटना आपण सोशल मीडियावर पाहात असतो. कधी कधी मुलं हट्ट करतात म्हणून पालक त्यांना हवं ते खेळणं आणून देतात. मुलंही खेळणी खेळण्यात दंग असतात. दरम्यान बऱ्याचदा तुम्हीही तुमच्या मुलांना खेळायला फुगा दिलाच असेल. मुलांनाही उडणारा फुगा आकर्षित वाटतो. मात्र हाच फुगा तुम्हाला आणि तुमच्या चिमुकल्यांना अडचणीत आणू शकतो. विश्वास बसत नाही ना, हा भयानक व्हिडीओ पाहा. एका फुग्याने आई आणि चिमुकल्याची काय अवस्था केली हे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मुलगा आपल्या आईसोबत एका खोलीत आहे. चिमुकल्याच्या हातात भलामोठा फुगा आहे. तिथंच शेजारी त्याची आई कपड्यांना इस्त्री करते आहे. खेळता खेळता मुलगा फुगा आईला मारायला जातो. त्याचवेळी फुगा फुटतो. एखादा बॉम्ब फुटावा तसा हा फुगा मुलाच्या हातातच फुटतो. भयंकर असं हे दृश्य आहे. हेलियम गॅसमुळे आग लागत नाही, असे व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. पण बरेच लोक त्यात इतर वायू मिसळतात. यामुळे, हेलियम वायूचा कधीकधी स्फोट होतो. त्यामुळे या गॅसने भरलेली खेळणी मुलांना देऊ नका

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आजवरचा सर्वात खतरनाक अपघात! मोबाईलमुळे २ ट्रेन आदळल्या एकमेकांवर, भयंकर अपघाताचा Video व्हायरल

पालकांनी लहान मुलांची व्यवस्थित काळजी घेण्याचं आवाहन अनेकदा केलं जातं. पण काही पालक आपल्या चिमुकल्यांकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचे फळ त्यांना भोागवे लागते. दरम्यान, प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेतलीच पाहिजे जेणेकरून त्यांना अशा दुर्घटनांना तोंड द्यावे लागणार नाही. दुर्लक्ष केल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत अनेक बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helium gas balloon exploded like bomb in baby hands shocking accident video viral on social media srk