Viral video: अजगर हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. तो छोट्या मोठे साप, बेडूक किंवा पक्षांच्या अंड्यांची वगैरे शिकार करत नाही. तर तो थेट हरणासारख्या मोठमोठ्या प्राण्यांवर हल्ला करतो. यावेळी अजगर एका मगरीची शिकार करत होता. पण मगर काही सोपी शिकार नाही. ती स्वत: एक अनुभवी शिकारी आहे. काही जणं तर मगरीला पाण्यातला राक्षस सुद्धा म्हणतात. यावरून तिची दहशत आपल्या लक्षात येईल. पण विचार करा हे दोन शिकारी जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा काय घडतं? अन् हीच गोष्ट तुम्ही या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता. अजगरानं मगरीवर हल्ला केला. तेवढ्यात मगरीनं सुद्धा पलटवार केला. पण शेवटी या युद्धात कोण जिंकल? हे आता तुम्हीच पाहा.
‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात; तर काही व्हिडीओ मजेदार असतात. त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात सुरुवातीला पाण्यात मगर पोहताना दिसतेय. तिची नजर समोरच्या दिशेला असते आणि ती आपल्या शिकाऱ्याकडे एकटक नजरेने पाहत असते. पुढच्याच क्षणी पाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला अजगर दिसू लागतो ज्याच्यावर मगरीने निशाणा साधलेला असतो. मगर अजगराला सोपा शिकार समजून त्याच्यावर हल्ला करते, पण तिची ही हिम्मत तिच्याच अंगलट येते. अजगर लगेचच प्रत्युत्तर देतो आणि मगरीला त्याच्या लांब शरीराने गुंडाळायला सुरुवात करतो. काही वेळातच अजगर मगरीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवते. सर्व प्रयत्न करूनही, मगर अजगरापासून स्वतःला मुक्त करू शकत नाही आणि त्याच्या विळखयता ती वाईटरित्या अडकली जाते. हळूहळू अजगर आपली पकड ढिली करतो आणि मगरीला आपली चूक लक्षात येते. व्हिडिओच्या शेवटी मगर अजगराला घाबरून दुसऱ्या दिशेला पाळताना दिसून येते, तर अजगरही तिथून निघून जातो.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ojatro नावाच्या युट्यूब अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.