Funny Kids Hospital Moments: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी एखाद्याची वेगळी खोडकर हरकत लोकांचं लक्ष वेधून घेते, तर कधी लहान मुलांची निरागस मासूमियत पाहून लोकांचं मन जिंकून घेतं. अगदी असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणं अशक्य होईल.
नर्स दिसताच मुलाने काय केलं?
या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, एक लहान मुलगा रुग्णालयात दाखल आहे. डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्याला इंजेक्शन द्यायचं असतं. पण, जसं नर्स इंजेक्शन घेऊन मुलाजवळ पोहोचते… तसं दृश्य पाहून सगळे थक्क होतात, कारण तो मुलगा इंजेक्शनच्या भीतीनं अक्षरशः पळत सुटतो आणि बेडखाली जाऊन लपतो.
मुलाच्या या निरागस खोडीवर तिथं उपस्थित असलेल्या दोन्ही नर्सेसही हसू आवरू शकत नाहीत. एकीकडे इंजेक्शनची जबाबदारी, तर दुसरीकडे मुलाचा गोड हट्ट… हा प्रसंग अगदी चित्रपटातील कॉमेडी सीनसारखा भासतो.
इंजेक्शनची भीती एवढी का?
लहान मुलांना औषधं खाण्यात नेहमीच नखरे असतात, पण इंजेक्शनचं नाव ऐकताच त्यांना धस्स होते. हातात सुई दिसताच काही जण ओरडतात, काही रडतात तर काही हुशार मुले अशीच एखादी ‘पळ काढण्याची’ शक्कल लढवतात. या मुलानेही तसंच काहीसं केलं.
सोशल मीडियावर तुफान चर्चा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @sauravyadav1133 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पाहतापाहता या व्हिडीओनं ७३ हजारांहून अधिक व्ह्युज मिळवले. हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरनं लिहिलं, “आजही मला इंजेक्शनची भीती वाटते… ब्लड टेस्ट करताना माझं बीपी चढ-उतार होतं.”
दुसरा म्हणतो, “काय मुलं, काय मोठे… इंजेक्शनची भीती सर्वांनाच असते.”
तर तिसरा युजर लिहितो, “मलाही खूप भीती वाटते, पण गंमत म्हणजे माझा मुलगा अजिबात घाबरत नाही.”
शेवटी काय झालं?
लोकांना आता उत्सुकता होती की, “मग त्या मुलाला इंजेक्शन दिलं की नाही?”
तर व्हिडीओच्या अखेरीस दिसतं की, नर्स मुलाला बेडखालून बाहेर काढते. छोट्या मुलाच्या डोळ्यात भीती तर चेहऱ्यावर गोडसा राग… पण अखेरीस नर्सनं त्याला प्रेमानं समजावलं आणि हळूहळू त्याला इंजेक्शन देण्यात यश आलं.
येथे पाहा व्हिडीओ
मुलाची ही धावपळ आणि निरागस हट्ट पाहून सोशल मीडियावर सगळेच फिदा झाले आहेत. खरंच, मुलांची मासूम भीती कधी कधी मोठ्यांनाही हसवून सोडते.