भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा त्यांच्या प्रेरणादायी आणि व्हायरल ट्विटसाठी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींची माहिती ते ट्विटच्या माध्यमातून देताना दिसतात. तसेच एखाद्या युजरची पोस्ट त्यांना मजेशीर किंवा कौतुकास्पद वाटली की ते त्या गोष्टीवर किंवा माहितीवर स्वतःचे मत मांडून ती सोशल मीडियावर शेअर करतात. तर आज आनंद महिंद्रा यांची थोडी फिल्मी स्टाईल पाहायला मिळाली आहे.

अलीकडेच एका एक्स (ट्विटर) युजरच्या पोस्टने आनंद महिंद्रांचे लक्ष वेधून घेतले. या युजरचे नाव कुशन मित्रा असे आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा १९७५ मध्ये प्रसिद्ध झालेला सुप्रसिद्ध चित्रपट शोलेच्या आठवणी सांगत या युजरने एक खास फोटो शेअर केला आहे. कर्नाटकातील बंगळुरूच्या रामनगर गावात रामनगर हिल्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या जागेचा एक फोटो शेअर केला आहे. दोन स्कॉर्पिओ गाड्यांच्या मधोमध ही व्यक्ती दोन्ही गाड्यांवर हात ठेवून उभी आहे. नक्की कॅप्शनमध्ये युजर काय म्हणाला आहे एकदा पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…रशियन व्लॉगर पोहोचली मुंबईतील श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; मंदिर पाहून झाली अवाक्, VIDEO शेअर करत म्हणाली, बाप्पाचे दर्शन…

पोस्ट नक्की बघा…

भारतीय सिनेसृष्टीत बसंती ही अशी व्यक्तिरेखा होती, जिने या सिनेमात टांगा चालवला होता. तर व्यक्तीने ही गोष्ट लक्षात ठेवून प्रश्न मांडला आणि लिहिले की, ‘आज शोले चित्रपटाचे चित्रीकरण झाले असते तर बसंतीने @MahindraScorpio वापरली असती का? कर्नाटकातील बंगळुरूच्या रामनगर गावात या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले होते. याला रामनगर हिल्स असेही म्हणतात. येथेच आयकॉनिक चित्रपटात गब्बरसिंगने ते डायलॉग उच्चारले होते, ‘कितने आदमी थे’, तर #BharatDrive सारख्या ड्राईव्हचा हा सर्वोत्तम भाग आहे; जिथे एखाद्याला यासारखी आश्चर्यकारक ठिकाणे पाहायला मिळतात, जी बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वेपासून अगदी जवळ आहे; अशी कॅप्शन युजरने या पोस्टला दिली आहे.

ही पोस्ट व्हायरल होताच आनंद महिंद्रांच्या नजरेस पडली व त्यांनी कुशन मित्राच्या पोस्टला चित्रपटाचा डायलॉग म्हणत रिपोस्ट करीत लिहिले की, “कितने स्कॉर्पिओ थे?”; तर आनंद महिंद्रांच्या या फिल्मी स्टाईलने नेटकऱ्यांचेही लक्ष वेधून घेतले. तसेच आनंद महिंद्रा एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट केलेली एक मीम पुन्हा पोस्ट केली. या मीममध्ये चित्रपटातील प्रतिष्ठित दृश्य दाखवण्यात आले होते, ज्यात दिवंगत अमजद खानने साकारलेला गब्बर सिंग त्याच्या साथीदाराला “कितने आदमी थे?” विचारतो, तर साथीदार “फक्त दोन सरदार” असे उत्तर देतो. हा मीम आनंद महिंद्रांनी हसणाऱ्या इमोजीसह पुन्हा रिपोस्ट केला आहे. सोशल मीडियावर या सर्व @kushanmitra आणि @anandmahindra यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे.