Viral video: आपल्या देशात सुशिक्षित तरुणांची संख्या कमी नाही. अगदी डॉक्टर, इंजिनियरपासून पार पदवी घेतलेले विविध क्षेत्रातील शिक्षण घेतलेले लाखो करोडो विद्यार्थी सापडतील. पण या उच्च शिक्षणाचा फायदा काय? अनेकांकडे नोकऱ्या नाहीत. किंवा तुटपूंज्या पगारात काम करावं लागतेय अशी तक्रार जो तो करतोय. याच पार्श्वभूमीवर एका लहान मुलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. कारण अयोध्यातील या लहान मुलाची दिवसाची कमाई एखाद्या डॉक्टर, इंजिनियरलाही लाजवेल एवढी आहे. या लहानग्याची दिवसाची कमाई एकून तुम्हीही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४, ते ५ तासात किती कमाई?

हा व्हिडीओ अयोध्येतील असून हा चिमुकला आयोध्येत घाटाच्या किनारी सकाळी ६ ते १० या वेळेत आयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या माथ्यावर टिळा लावून १ हजार कमाई करतो. तर त्यानंतर संध्याकाळी हाच चिमुकला भाविकांच्या माथ्यावर चंदन लावतो आणि त्या ४, ते ५ तासात ५०० रुपयांची कमाई करतो. हा चिमुकला जेवढी कमाई करतो तेवढीच कमाई एखाद्या डॉक्टर किंवा इंजिनियरचही असते. एखाद्या डॉक्टर, इंजिनियरलाही लाजवेल एवढी कमाई एकून व्हिडीओ काढणारा व्यक्तीही अवाक् होतो.

“डॉक्टरांपेक्षा कमी आहे का?”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती या चिमुकल्याला प्रश्न विचारत आहे आणि तो त्याची कमाई सांगत आहे. शेवटी हा व्यक्ती चिमुकल्याला बोलतो, “तुझी तर कमाई एखाद्या डॉक्टर किंवा इंजिनियर एवढीच आहे.” तर यावर तो चिमुकला “डॉक्टरांपेक्षा कमी समजलंय का?” असं उत्तर देतो. चिमुकल्यानं दिलेल्या या उत्तराचं सर्वजण कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल.

हेही वाचा >> VIDEO: अंधश्रद्धेचा कळस! सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू, जिवंत होईल या आशेने दोरीला बांधून गंगा नदीत लटकवलं अन् नंतर…

हा व्हिडीओ guardians_of_the_cryptoverse या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओनं सुशिक्षित नोकरदार तरुणांच्या मनावर आघात केले असं म्हणता येईल. कारण हा व्हिडीओ १८ मिलियन पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. काही नेटकरी म्हणतायेत, नोकरीमध्ये न मिळणाऱ्या पगारवाढीचे अनुभव सांगतायेत. तर दुसरा म्हणतो, आता मी पण हे काम सुरु करतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ayodhya little boy earn more money than doctor and engineer funny video viral news in marathi srk