बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. सुरुवातीला ते त्यांच्या दरबारात दावा केल्या जाणाऱ्या चमत्करांमुळे चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाखतींमधून केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते. त्यांनी संत तुकाराम यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती. तर साईबाबा यांच्याविषयीही त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं, त्यानंतरही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

अशातच आता धीरेंद्र शास्त्री यांच्यावर बिहारमधील एक मंत्री भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धीरेंद्र शास्त्री बिहारला जाणार आहेत. त्याच्याआधीच बिहार सरकारमधील अनेक मंत्री आणि नेते त्यांचा विरोध करत आहेत. अशातच मंत्री सुरेंद्र यादव यांनी धीरेंद्र शास्त्रींवर जोरदार टीका केली आहे, “धीरेंद्र शास्त्री हे भुताच्या नावाखाली महिलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवतात” असं वक्तव्य सुरेंद्र यादव यांनी केलं आहे.

हेही पाहा- फेमस होण्यासाठी कायपण! पठ्ठ्याने चक्क बैलाला घोड्यासारखं पळवलं अन्…, व्हायरल Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

व्हिडीओमध्ये काय म्हणाले सुरेंद्र यादव?

व्हायरल व्हिडिओमध्ये मंत्री सुरेंद्र यादव म्हणत आहेत की, बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र शास्त्री जर बिहारमध्ये येऊन तुमच्या बहिणींना-मुलींना भुताच्या नावाखाली आपल्या इशाऱ्यावर नाचायला लावत असेल तर, तुम्ही पाण्यात बुडून मरा, ते पुढे म्हणाले, जे नेते किंवा पक्ष बागेश्वर धामला पाठिंबा देतात त्यांच्या घरातील महिला तिथे जातात का? तुमच्या घरातील महिला तिथे जातात ही लाजीरवाणी गोष्ट आहे.

मंत्र्यांच्या वक्त्यावरुन ‘सोशल-वाद’ –

हेही पाहा- …म्हणून अमोल कोल्हे ‘त्या’ बाळाच्या पाया पडले! बघता क्षणी असं घडलं तरी काय? Video होतोय व्हायरल

सुरेंद्र यादव यांच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हे नितीश कुमार यांचे मंत्री आहेत, ते सनातन धर्माचा आणि बिहारधील महिलांचाही आदर करत नाहीत.” श्रवण चौधरी नावाच्या नेटकऱ्याने तर यादव यांना मंत्रिपदावरून हटवून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी मंत्री यादव यांचं वक्तव्य बरोबर असल्याचं म्हटलं आहे.

धीरेंद्र शास्त्री १३ मे रोजी बिहारमध्ये –

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री 13 मे रोजी बिहारला जाणार आहेत. धीरेंद्र शास्त्रींच्या बिहार दौऱ्यावर आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे, “धीरेंद्र शास्त्री हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांनी तसं केलं तर आम्ही त्यांना विरोध करणार.”