In Mumbai Local Shows Man Spotted Wearing Instagram flip flop slipper : तुम्हाला बस, मुंबई लोकल, मेट्रोमध्ये फंकी ॲक्सेसरीज घातलेले तर कधी ब्रँडेड उत्पादनांच्या डुप्लिकेट आवृत्त्या वापरणारे अनेक लोक भेटले असतील. मात्र, मुंबई लोकल (Mumbai Local) ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने असे काही परिधान केलेले दिसले, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. प्रवासादरम्यान तुम्ही लोकांना सोशल मीडिया ॲप्स स्क्रोल करताना पाहिले असेल. पण, आज एका प्रवाशाने पायात एका सोशल मीडियावरील एका प्रसिद्ध ॲपची चप्पल घातली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल पोस्ट मुंबई लोकलची ( Mumbai Local) आहे. मुंबई लोकलमधून @ Abhishek Yadav हा इन्स्टाग्राम युजर प्रवास करत असतो. या प्रवासादरम्यान त्याच्या समोरच्या सीटवर एक व्यक्ती बसलेली दिसते. या व्यक्तीने पायात स्टाईलिश फ्लिप फ्लॉप चप्पल घातलेली असते. आता तुम्ही म्हणाल की, यात काय नवल आहे? तर या वक्तीच्या स्टाईलिश फ्लिप फ्लॉपवर इन्स्टाग्रामचा लोगो असतो. ही तशी मजेशीर व अनोखी गोष्ट पाहता युजरने त्याची ओळख न दाखवता या गोष्टीचा फोटो काढून घेतला. नक्की बघा ही व्हायरल पोस्ट…

हेही वाचा…VIDEO : वाघाची चिमुकल्याबरोबर मस्ती की लढाई? पंजांचा खेळ सुरू झाला अन्… पाहा शेवटी कोण जिंकलं?

पोस्ट नक्की बघा…

इन्स्टाग्रामचा लोगो असणारी फ्लिप फ्लॉप :

अनेकदा प्रवास करताना कोणी छान कपडे/गेटअप केला असेल किंवा काहीतरी आगळेवेगळे कानातले किंवा चप्पल घातली असेल तर आपलं लक्ष त्याकडे आपसूकच जाते. तर आज एका प्रवाशालासुद्धा तसाच काहीसा अनुभव आला. त्याने मुंबई लोकलमध्ये ( Mumbai Local) एका माणसाच्या पायात घातलेल्या स्टाईलिश फ्लिप फ्लॉपवर इन्स्टाग्राम ॲपचा लोगो पाहून तोही थक्क झाला. त्याच्या चप्पलचा रंग काळा होता आणि त्याच्या समोर ॲपचा चमकदार पांढरा लोगो होता. तर या गोष्टीने मुंबई लोकलच्या डब्यातील सहप्रवाशांचे लक्ष आपसूकच वेधले गेले.

सोशल मीडियावर ही पोस्ट @ab_yadav90 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच ‘डिअर इन्स्टाग्राम या व्यक्तीनं तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे’; असे मस्करीत कॅप्शन दिली आहे. विशेष म्हणजे, काही दुकाने आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत, जे ग्राहकांना अशी उत्पादने उपलब्ध करून देतात. Amazon आणि IndiaMart सारख्या प्रख्यात ऑनलाइन शॉपिंग साइट्सदेखील खरेदीदारांना अशा आगळ्यावेगळ्या चप्पल खरेदी करण्याची संधी देतात. पण, एका प्रवाशाने ही गोष्ट पहिल्यांदाच पाहिल्याने त्याने या गोष्टीचा आवर्जून फोटो काढला आणि स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai local man spotted wearing flip flop slipper featuring the instagram logo on it passengers netizens shock must watch asp