Video Shows Tiger Playful Response To Toddler : वाघाचे नाव ऐकताच आपल्यातील अनेकांचा थरकाप उडतो. तो अचानक समोर आला, तर भीतीने बोलणेही बंद होते. पण, त्याला प्राणिसंग्रहालयात जाऊन पाहण्याचीसुद्धा तेवढीच उत्सुकता असते. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका चिमुकल्याने प्राणिसंग्रहालयाला भेट दिली आहे. यादरम्यान वाघाचे थरकाप उडवणारे नाही, तर अगदी प्रेमळ रूप पाहायला मिळाले आहे.

व्हायरल व्हिडीओ ( Video) चीनचा आहे. आपल्या कुटुंबाबरोबर प्राणिसंग्रहालयात एक चिमुकला गेलेला दिसतो आहे. एका काचेच्या बंद खोक्यात वाघाला ठेवलेले असते. चिमुकला त्या बॉक्सजवळ जाऊन उभा राहतो आणि हाताच्या पंजाने काच ओरबाडण्याचे नाटक करू लागतो. चिमुकल्याला असे करताना पाहून वाघ चालत थोडा पुढे जातो, परत मागे येतो आणि हुबेहूब चिमुकल्याची नक्कल करण्यास सुरुवात करतो. वाघाने चिमुकल्याची केलेली नक्कल व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
This PMPML bus driver has tried to teach a lesson to the reckless driver who was driving on the wrong side.
पुणेकरांचा नाद करायचा नाही! ‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला घडवली अद्दल, Video होतोय Viral
anganwadi worker cross the flooded river video goes viral
Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?
Tourists Pull The Lions Hair And Then Watch What The King Of The Jungle Does Animal Video Goes Viral
पर्यटकांनी चक्क सिंहाच्या केसांना हात लावला; जंगलाचा राजा संतापला अन् दाखवला असा इंगा की…VIDEO पाहून थरकाप उडेल
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक

हेही वाचा…VIDEO : ‘पैसा नाही फक्त मनात…’ चिमुकल्यांनी सायकलवरून काढली बाप्पाची मिरवणूक; आगमनाचा जल्लोष एकदा पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

वाघाची चिमुकल्याबरोबर मस्ती :

व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिलं असेल की, चिमुकला हाताच्या पंजांनी काचेवर ओरबाडण्यास सुरुवात करतो. हे पाहून वाघसुद्धा तसेच करू लागतो आणि दोघांमध्ये हाताच्या पंजांचा हा अनोखा खेळ रंगतो. दोघेही एकमेकांबरोबर बराच वेळ हा खेळ खेळू लागतात आणि थरकाप उडवणाऱ्या वाघाचे हे खेळकर रूप पाहायला मिळते. वाघाला आपली नक्कल करताना पाहून चिमुकलासुद्धा खूश होतो. तसेच चिमुकल्याची आई त्यांच्यातील त्या गोंडस क्षणाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेताना दिसते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) @TheFigen_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘हाताच्या पंजांची लढाई’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. वाघाचे हे अनोखे रूप पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत. वाघाला खेळताना पाहून अनेक युजर्सनी त्या दोघांचे विविध शब्दांत कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट केली आहे, “मला जवळजवळ विश्वासच बसत नाही आहे की वाघ खेळत आहे.” दुसरा म्हणत आहे, “हे खूपच गोंडस आहे.” तिसरा म्हणतोय, “वाघ व चिमुकला यांच्यातील मनमोहक खेळ खूपच सुंदर आहे.” अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट्स व्हिडीओखाली दिसत आहेत.