Kamala Harris dance video: अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन आणि पहिल्या आशियायी अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस सुरुवातीपासून चर्चेत राहिल्या आहेत. मात्र सध्या त्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या व्हाईट हाऊस येथे एका पार्टीमध्ये डान्स करत आहेत. हॅरीस यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी मात्र हॅरीस यांच्या व्हिडीओला ना पसंती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२२ सेकंदांचा हा व्हिडिओ राजकीय समालोचक अँथनी ब्रायन लोगन यांनी शेअर केला होता. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कमला हॅरीस यांनी ९० च्या दशकातील फॅशनची आठवण करून देणारा बहु-रंगीत शर्ट आणि गुलाबी पॅंट परिधान करून हिप-हॉप संगीतावर नाचताना दिसत आहेत.

कमला हॅरीस ट्रोल

दरम्यान मूळ व्हिडीओ हा राजकीय रणनीतीकार जॉय मॅनारिनो यांनी पोस्ट केली होता. यावेळी त्यांनी त्यांच्या देशासमोरील सध्याची आव्हाने पाहता कमला हॅरीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी लिहिले, “आपला देश जळत आहे, महागाई वाढली आहे, आर्थिक मंदी पसरली आहे, बेकायदेशीर इमिग्रेशन आपल्याला एकमेकांपासून दूर नेत आहे. आणि कमला हॅरिस एका पार्टीत आहे.” अशी टीका त्यांनी केली आहे. यानंतर त्यांना सोशल मीडियावरही ट्रोल करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जगंलात एकाच वेळी वाघाच्या संपूर्ण कुटुंबाची लागली डुलकी; नेटकरी म्हणतात “हे कसं शक्य आहे?”

पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “हिप-हॉप पार्टीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त कमला हॅरिस.” व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक कमला हॅरीस यांच्या डान्स स्टेप्सची खिल्ली उडवत आहेत तर काही त्यांच्या रंगीबेरंगी ड्रेसची खिल्ली उडवत आहेत. तर काही सोशल मीडिया वापरकर्ते आहेत जे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamala harris dances to hip hop at white house party internet has lots to say srk