Kashmir Mangoge To Cheer Denge Post: मार्केटिंग व प्रसिद्धीसाठी गरजेची असते ती एक ओळ. अशी ओळ जी लोकांचं लक्ष वेधून घेईल, तुम्हाला चर्चेत आणेल. अलीकडेच ब्लिंक इट, झोमॅटो व नेटफ्लिक्सने एक जाहिरातीचा फलक शेअर केला होता. आपणही मागील काही दिवसात ही जाहिरात अनेकदा सोशल मीडियावर पहिली असेल. दूध मांगोगे दूध देंगे, खीर मांगोगे खीर देंगे असं म्हणत ब्लिंक इट व झोमॅटोने ही जाहिरात बनवली होती. पण आता यात भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी आक्रमक सहभाग घेत एक फोटो शेअर केला आहे. दूध मांगोगे याच ओळीतील मूळ वाक्य म्हणजेच काश्मीर मांगोगे तो चीर देंगे असं लिहिलेला एक पोस्टर बग्गा यांनी शेअर केला आहे. आता या पोस्टरवरून नेटकरी बग्गा यांना चांगलंच ट्रोल करत आहेत. नेमका हा प्रकार काय आहे, जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दूध मांगोगे.. मूळ जाहिरात

ब्लिंकिटच्या पिवळ्या बोर्डावर “दूध मांगोगे, दूध देंगे (तुम्ही दुधाची ऑर्डर दिलीत तर आम्ही दूध देऊ) असे लिहिले होते. त्यावर झोमॅटोने उत्तर दिले आणि म्हणाले, “खीर मांगोगे, खीर देंगे (तुम्ही खीर मागवली तर आम्ही खीर देऊ). एवढेच नाही. नेटफ्लिक्सने देखील यात सहभाग घेत आणि स्ट्रिमिंग अॅपवरील वेडन्सडे या लोकप्रिय शोचे प्रमोशन करून घेतले. “फ्रायडे मॅंगोगे, वेनस्डे डेंगे (तुम्ही शुक्रवार मागितल्यास, आम्ही तुम्हाला बुधवार देऊ) असा बोर्ड शेअर केला. याच ट्रेंडचा भुरळ बग्गा यांनाही पडला.

मॉर्फ केलेली जाहिरात काय होती?

तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी मूळ जाहिरातीत ‘झटका बिर्याणी’ अशा बनावट ब्रँडच्या नावाने नवे पोस्टर जोडले. यावर लिहिलं होतं, “काश्मीर मांगोगे तो चीर देंगे” भारतातील पहिली झटका बिर्याणी आणि बाजूला छोटा लोगोही लावला होता. हे मॉर्फ केलेले पोस्टर बग्गा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. ज्यावर आता नेटकरी ट्रोल करत आहेत. काहींनी यामध्ये मोदींचा फोटो लावून बेरोजगारीवर भाष्य केलं आहे. तर काहींनी बग्गा यांना वाह्ह फोटोशॉप मास्टर अशी पदवीच देऊन टाकली आहे.

काश्मीर मांगोगे तो चीर देंगे पोस्टवरील ट्रोल

दरम्यान, ‘मां तुझे सलाम’ या चित्रपटातील ”तुम दूध मांगोगे हम खीर देंगे, तुम कश्मीर मांगोगे हम चीर देंगे” हे वाक्य वर्षानुवर्षे वापरण्यात आले आहे. काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यानंतर हे वाक्य सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रचंड ट्रेंड झाले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmir mangoge cheer denge post by bjp tajinder singh bagga after blink it zomato ads poster tollers call photoshop master svs