Shocking video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात एक किंग कोब्रा साप अशा ठिकाणी अडकून बसला की तुम्ही विचारही करु शकत नाही. एका शिक्षकाच्या पँटमध्ये भर वर्गात चक्क किंग कोब्रा अडकला आहे. याचा व्हिडीओही सध्या समोर आला असून व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
असे अनेक प्राणी आहेत, ज्यांना पाहून माणूस भीतीने थरथर कापू लागतो. यापैकी एक प्राणी म्हणजे साप. या रांगणाऱ्या प्राण्याच्या अनेक प्रजाती आहेत. यातील एक प्रजाती कोब्रा सापाची आहे, जी सर्व सापांमध्ये अत्यंत विषारी मानली जाते.
नेमकं काय घडलं?
या व्हिडीओमध्ये दोन तरुण एका शिक्षकाच्या पँटमधून साप बाहेर काढताना दिसत आहेत. हा साप काढण्यासाठी या शिक्षकाला अक्षरश: पँट काढावी लागली आहे. तरीही हा साप बाहेर यायचं नाव घेत नाहीये. किंग कोब्रा सारखा साप असल्यानं या सापाता दंश म्हणजे माणूस संपल्यातच जमा असतो. मात्र शेवटी दोन तरुण अलगदपणे अनेक प्रयत्न करुन हा साप बाहेर काढतात. समोर आलेल्या माहिती नुसार हा थायलंडमधील शाळेतील आहे. तर या शाळेमध्ये साप कसा पकडायचा? याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जात होतं.त्यावेळी हा कोब्रा शिक्षकाच्या हातून सटकला आणि थेट त्याच्या पँटमध्ये शिरला. त्यानंतर या डेमो कार्यक्रमात उपस्थित असलेल्या इतर दोन सर्पमित्रांनी मोठ्या सावधानतेनं त्या सापाला बाहेर काढलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “जगायचं की नाही” रस्त्यावर भाजीपाला खरेदी करताय? थांबा; हा VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ indypersian नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे तर अनेकांनी सुरक्षेची काळजी न घेतल्यानं टीकाही केली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd