Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात बऱ्याचदा डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समोर येत असतात. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साडी नेसून या महिलांनी चाळीतल्या छोट्याशा जागेत भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या महिलांनी “”बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतंय” ” या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हल्ली मराठी गाण्यांवर फारसं कुणी डान्स करताना दिसत नाही, मात्र या महिलांनी मराठी गाण्यावर असा डान्स केला आहे की, पाहून तुम्हीही थिरकायला लागाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चार महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी स्टेप अशा केल्या आहेत की, जणू काही त्या प्रोफेशनल डान्सरच आहेत. चाळीतल्या मोकळ्या जागेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.

अनेक लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mansi.gawande.73 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकानं यावर प्रतिक्रिया देत म्हंटलंय की, “आवडीला वयाची मर्यादा नसते” अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies group dance on marathi song gubu gubu vajtay dj mahrathi song video goes viral srk