Lion Shocking video : सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी फार भीतीदायक असतात तर काही फारचं विनोदी असतात. सिंह हा जंगलाचा राजा आहे, ज्याला सगळे वन्य प्राणीच नाही तर मानवही घाबरतात. सिंहाला दूरून जरी पाहिले तरी थरकाप उडतो. अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या निर्जन रस्त्यावर झोपलेल्या एका व्यक्तीजवळ सिंहीण फिरताना दिसली तर? तुम्ही काय कराल. यावेळी एकतर तुम्ही घाबरून पळून जाल किंवा भीतीने तुम्हाला चक्कर येईल. पण, शांत झोपलेल्या माणसाची यावेळी काय प्रतिक्रिया होती हे पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक माणूस फूटपाथवर चटईवर झोपला आहे. आजूबाजूला कोणीही नाही. यावेळी अचानक एक सिंहीण रस्त्यावर येते आणि पुढे जाते. त्यानंतर ती पुन्हा त्या माणसाजवळ येते आणि वास घेऊन निघून जाते. या दरम्यान ही व्यक्ती इतकी गाढ झोपेत होती की, त्याला सिंहीण त्याच्या जवळून गेल्याचेही कळले नाही. सिंहिणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

पण, अनेक युजर्स हा एआय जनरेटेड व्हिडीओ असल्याचे म्हणत आहेत. त्याचवेळी काही जण म्हणत आहेत की, जर सिंह असेल तर हे ठिकाण गुजरात असले पाहिजे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, आजकाल प्राणी माणसांसारखे वागतात आणि माणसे प्राण्यांसारखी वागतात, काळ बदलला आहे. दुसऱ्या एका युजरने मजेदार कमेंट करत लिहिले की, दारु पिऊन झोपला असावा, त्याचा वास घेतल्यानंतर सिंहालाही चक्कर आली असेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lion passing through man sleeping came close start sniffing what happened next see shocking video sjr