शेतकरी कोणतेही कष्टाचे काम असो ते ताकदीने पूर्ण करतो. शेतात बैल नांगरणी असो वा डोक्यावर लाकडाचे जड भारे घेऊन जाणे असो, कोणत्याही कामाला तो मागे हटत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या ताकदीला तोड नाही असे म्हटले जाते. पण हल्ली ट्रॅक्टर, बाईकच्या मदतीने शेतकऱ्यांची अनेक कामे सोप्पी आणि वेगाने होत आहेत. पण काही शेतकरी बाईक, ट्रॅक्टरचा काहीवेळा अशाप्रकारे उपयोग करतात ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. सध्या अशाच एका शेतकऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून हसून हसून तुमच्याही पोटात दुखेल. या व्हिडीओमध्ये एक शेतकरी बाईकवरून ओव्हरलोड चारा घेऊन जात आहे. यामुळे त्याला बाईकचे हँडल देखील नीट दिसत नाही.
हा मजेशीर व्हिडीओ आता अनेकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. पण अशाप्रकारे बाईक चालवणे अनेकदा जीववरही बेतू शकते. त्यामुळे असे स्टंट करुन नका असा सल्ला दिला जात आहे. मात्र हा भारत आहे, त्यामुळे इथे कोणत्याही अशक्य गोष्ट सहज शक्य केली जाते. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक शेतकरी टीवीएस एक्सएल बाईकवरून चारा घेऊन जात आहे.पण त्याने इतका ओव्हरलोड चारा भरला आहे की ज्यामुळे त्याला हँडल पकडून बाईक चालवण्यासाठी चाऱ्यावर अक्षरश: झोपावे लागत आहे. शेतकऱ्याची बाईक चालवण्याची ही पद्धत खूपच हास्यास्पद आहे. त्यामुळे युजर्सच्या देखील हा व्हिडीओ खूप पसंतीस पडत आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, हे फक्त भारतातील लोकच करु शकतात. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, भावा, हा तर प्रो लेव्हलचा हेवी ड्रायव्हर आहे. chrisbetzmann नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला ३३ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहे.