Man Marries Own Daughter has Group Sexual Relations with 15 year old tells its the order of God Read Details | Loksatta

पोटच्या लेकीशी लग्न, १५ वर्षीय मुलींशी सामूहिक शरीरसंबंध अन्.. देवाच्या नावावर केलेलं लज्जास्पद कृत्य उघड

Shocking News: ४६ वर्षीय इसमाने १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या २० मुलींशी लग्न केल्याचा आरोप एफबीआयने लगावला आहे. यातील एका मुलीचे वय तर अवघे १२ वर्ष असल्याचे समजत आहे.

पोटच्या लेकीशी लग्न, १५ वर्षीय मुलींशी सामूहिक शरीरसंबंध अन्.. देवाच्या नावावर केलेलं लज्जास्पद कृत्य उघड
पोटच्या लेकीशी लग्न, १५ वर्षीय मुलींशी सामूहिक शरीरसंबंध अन्..(लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ ट्विटर)

Shocking News: अमेरिकेतील एका पंथाच्या पुढाऱ्याने स्वतःच्या मुलीशी लग्न केल्याचे प्रकरण सध्या उघडकीस आले आहे. सॅम्युअल रॅपीली बेटमन या ४६ वर्षीय इसमाने १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या २० मुलींशी लग्न केल्याचा आरोप एफबीआयने लगावला आहे. यातील एका मुलीचे वय तर अवघे १२ वर्ष असल्याचे समजत आहे. फेडरल कोर्टाच्या दस्तऐवजात दिलेल्या माहितीनुसार बेटमनने या सर्व महिलांसह सामूहिक लैंगिक संबंध ठेवले होते. नेमका हा प्रकार काय जाणून घेऊयात..

सॉल्ट लेक ट्रिब्यूनने एफबीआयच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये लॅटर-डे सेंट्स (FLDS) जिझस क्राइस्ट ऑफ फंडामेंटलिस्ट चर्च या पंथातील काही मोजक्या अनुयायांचा पाठिंबा मिळवल्यानंतर बेटमनने स्वतःला प्रेषित म्हणून घोषित केले होते. बेटमनने स्वतःच्याच किशोरवयीन मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करताच त्याच्या पत्नीने आपल्या मुलीसह कोलोरॅडोमधील घर सोडले. पण यानंतर पेटून उठलेल्या बेटमनने आधी तरुणी, नंतर अगदी लहान मुली, आणि नंतर त्याच्या अनुयायांच्या पत्नींना स्वतःची पत्नी म्हणून घोषित करण्यास सुरुवात केली.

एफबीआय स्पेशल एजंट डॉन ए. मार्टिन यांच्या माहितीनुसार, बेटमनच्या अनुयायाने विरोध करताच त्याने सांगितले की, स्वर्गीय पित्याने (जीजस क्राईस्ट) नोव्हेंबर २०२१ च्या सुरुवातीला मुलींना व तरुणींचे स्त्रीत्व पूर्ण करून त्यांना स्वीकारण्याचे आदेश दिले होते.

कोलोरॅडोच्या नागरिकांनी नोव्हेंबर २०२० मध्ये बेटमनबद्दल तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली होती.मार्टिन यांच्या माहितीनुसार २३ नोव्हेंबर २०२० मध्येच एका महिलेने कॉलोराडो सिटी मार्शलच्या कार्यालयात कॉल करून बेटमनविरुद्ध तक्रार केली होती. बेटमनने २००९ मध्ये जन्मलेल्या म्हणजेच अवघ्या ११ वर्षीय मुलीशी लग्न केल्याचा आरोप या महिलेने लगावला होता. यासंबंधी जेव्हा पोलिसांनी या मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला तेव्हा मात्र त्यांनी ही अफवा असल्याचे म्हंटले आहे, विशेष म्हणजे या मुलीचे वडील सुद्धा बेटमनचे अनुयायी आहेत.

हे ही वाचा<< Video: हात धरला, तोंड खेचलं आणि बघ्यांनी मला.. दक्षिण कोरियातील तरुणीने सांगितला मुंबईतील धक्कादायक अनुभव

दरम्यान २०२२ च्या सप्टेंबरमध्ये बेटमन राज्याच्या सीमा ओलांडून मुलींना पळवून नेताना पकडला गेला व तेव्हापासून या प्रकरणी एफबीआयने तपास सुरु केलाआहे . ४६ वर्षीय बेटमनवर अद्याप लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली नसली तर एफबीआयच्या माहितीनुसार, हा इसम अॅरिझोना, उटाह, नेवाडा आणि नेब्रास्का या भागात अल्पवयीन मुलींची तस्करी करत होता. सध्या स्थानिक पातळीवर बाल शोषणाच्या तीन गुन्हे बेटमनवर लगावण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 10:25 IST
Next Story
Video: सरन्यायाधीश चंद्रचूड लपूनछपून करायचे ‘रेडियो जॉकी’ची नोकरी; म्हणाले, “मी ‘प्ले इट कूल’, ‘डेट वीथ यू’ तसेच…”