Man Performs Dangerous Bike Stunt At Home : आजच्या तरुणांमध्ये बाइकबरोबर स्टंटबाजीची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अशाप्रकारे सोशल मीडियावर अनेक प्रकारचे स्टंटमन दररोज स्टंटबाजी करताना दिसतात. ज्यामध्ये काही स्टंटबाज त्यांच्या अप्रतिम स्टंटने लोकांना आश्चर्यचकित करतात, तर काही खूप हसवतात. नुकताच सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती घरात बाईक घेऊन स्टंट करताना दिसत आहे. पण, पुढच्याच क्षणी त्याच्याबरोबर जे काही घडते त्याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की, बाकी काही नाही; या तरुणाला आपला अति उत्साहीपणाच नडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करतात. यावेळी काहीजण व्हायरल होण्यासाठी नवनवीन आयडिया वापरतात, तर काही स्टंटबाजी करताना दिसतात. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती काहीतरी तुफानी करण्याच्या नादात थेट घरात बाईक घेऊन येत स्टंटबाजी करताना दिसत आहे. बाईकचे एक टायर हवेत उंचावत तो स्टंट करत असतो. यावेळी त्याच्याबरोबर अशी काही गोष्ट घडते, जी तो आयुष्यभर विसरणार नाही. व्हिडीओमध्ये दिसते की, स्टंट करत असताना बाईकचे पुढचे टायर टीव्हीला लागते आणि टीव्ही खाली पडून फुटतो. व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, घरामध्ये स्टंटबाजी करणे या व्यक्तीला किती महागात पडले असेल. कारण स्टंट दाखवणं हा लहान मुलांचा खेळ नाही, ज्यासाठी खूप मेहनत करावी लागते, खूप सराव आवश्यक असतो.

हा व्हिडीओ diogo_grau06 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांनी पाहिला आहे, तर दोन लाख लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man performing dangerous bike stunt in room shocking stunt video goes viral sjr