शाळेला सुट्टी पडली की, मित्र मैत्रिणींबरोबर नवनवीन खेळ खेळण्यात येतात. लपाछुपी, क्रिकेट, कबड्डी, लगोरी, व्यापार, बॅडमिंटन आदी अनेक खेळ आवडीने खेळले जातात. या प्रत्येक खेळाचे काही नियम आहेत व हे खेळ खेळण्यासाठी खास गोष्टींचीही गरज लागते. उदाहरणार्थ, जसं बॅट खेळण्यासाठी बॅट-बॉल हा लागतो. तसंच बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी दोन व्यक्ती, बॅडमिंटन रॅकेट आणि शटलकॉकची गरज असते. तर आज सोशल मीडियावर बॅडमिंटन खेळाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, इथे चक्क झाडूने बॅडमिंटन हा खेळ खेळण्यात येतो आहे.

व्हायरल व्हिडीओत एक तरुण आणि तरुणी हॉलमध्ये बँडमिंटन खेळ खेळत असतात. तेव्हा तिथे एक व्यक्ती येतो आणि फरशीवर झाडू मारण्यास सुरुवात करतो. तितक्यात त्याच्या डोक्यात कोणती कल्पना येते माहिती नाही. पण, तरुणीला बाजूला सारून तो तरुणांबरोबर बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात करतो. पण, व्यक्ती कोणत्या वस्तूबरोबर हा बॅडमिंटन खेळ खेळतो आहे एकदा तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…सायकल चालवतोय की गाडी! व्यक्तीने सायकलवर लावली कारची सीट अन्… जुगाड पाहून व्हाल थक्क! पाहा व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल दोन तरुण बँडमिंटन खेळ खेळत असतात. तितक्यात एका व्यक्ती हातात झाडू घेऊन प्रवेश करते. बघता बघता तो झाडू हातात घेऊन बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात करतो. अगदी बॅडमिंटनचे रॅकेट हातात धरून जसा शटलकॉक दुसऱ्या व्यक्तीकडे फेकला जातो. अगदी त्याचप्रमाणे झाडूने शटलकॉक मारण्यात येत असून हा अनोखा बॅडमिंटन खेळ खेळण्यात येतो आहे. व्हिडीओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता असा अनोख्या पद्धतीने हा खेळ खेळून तो या खेळाचा विजेताही ठरतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @badmintonplayer_jatin या इन्स्टाग्राम अकाउंटवरून खेळण्यात आला आहे. तुम्ही युजरचे अकाउंट पहिले असेल तर तुम्हाला बॅडमिंटन सराव करतानाचे अनेक व्हिडीओ दिसून येतील. यामध्ये व्यक्ती बॉटलने सुद्धा बॅडमिंटन खेळताना दिसून आली आहे. तर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट केली आहे की , ‘कोण म्हणतं की, बॅडमिंटन फक्त रॅकेटने खेळण्यात येतो’ . तसेच अनेक जण व्यक्तीच्या अनोख्या कौशल्याची कमेंटमध्ये प्रशंसा करताना दिसून येत आहेत.