प्रत्येकाचे स्वतःची हक्काची गाडी असावी, असे स्वप्न असते. ही हक्काची गाडी मग चार चाकी असो किंवा दुचाकी; ती प्रत्येक व्यक्तीला प्रिय असते. या गाडीवर एखादा लकी नंबर किंवा जन्मतारीख नंबर प्लेटवर लिहिली जाते, नाही तर घरातील चिमुकल्याचे नाव या गाडीवर स्टिकरच्या साह्याने लावण्यात येते. अशा अनेक गोष्टी स्वतःची हक्काची गाडी आकर्षित करण्यासाठी केल्या जातात. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; जिथे तरुणाने आपल्या गाडीकडे सगळ्यांचे लक्ष जावे म्हणून सायकलचा पूर्ण नक्षाच बदलून टाकला आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने सायकलचे पूर्ण रूप पालटले आहे. सायकलच्या सीटच्या जागी कारची सीट बसवली आहे. एवढेच नाही, तर सायकलच्या पॅडलची जागाही या तरुणाने बदलली आहे आणि तो झोपून सायकल चालवतो आहे. सामान्यत: सायकल ही सीटवर बसून चालवली जाते; पण या तरुणाच्या जुगाडामुळे त्याला ही सायकल झोपवून चालवावी लागते आहे. एकदा बघाच तरुणाचा हा अजब जुगाड.

Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
robbing shopkeepers
दुकानदारांना लुटण्याचा हा नवीन प्रकार तुम्ही पाहिला आहे का? व्हिडीओ पाहा अन् सतर्क व्हा
man opts for papaya over cake on birthday
व्यक्तीने वाढदिवशी केकऐवजी कापली पपई, पण का? नेटकऱ्यांना पडला प्रश्न, व्हिडीओ तुफान व्हायरल
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा…नागपूरच्या डॉली चहा विक्रेत्याची बिल गेट्सनाही पडली भुरळ; VIDEO शेअर करत म्हणाले, ‘साधा कप चहा…’

व्हिडीओ नक्की बघा :

या तरुणाने सायकलचे सीट लावून ओपन कारमध्ये रूपांतर करून घेतले आहे. तसेच मनोरंजक गोष्ट अशी आहे की, सायकलमध्ये पॅडल तळाशी असतात. पण, या तरुणाने झोपून आरामात सायकल चालविता यावी यासाठी या सायकलचे पॅडल वरच्या बाजूला लावून घेतले आहे. त्यामुळे तो सहज झोपून सायकल चालवतो आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका अज्ञात रहिवाशाने हा मजेशीर क्षण व्हिडीओत शूट केला आहे; जो थक्क करणारा आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @bunnypunia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून विविध प्रतिक्रिया देत आहेत. तरुणाने सायकलची केलेली रचना पाहून काही जण कौतुक करीत आहेत. तर अनेक जण, “तुमचा सीट बेल्ट लावा. नाही तर, पुढे चलन भरण्यास सांगितले जाईल”, असे म्हणताना दिसत आहेl. तर “अशा रचनेच्या गाड्यांना लिनियर रेकम्बंट बाइक्स म्हणतात”, असे एक युजर सांगत आहे. तर, तिसऱ्या युजरने, व्वा मज्जा आहे! अशी कमेंट केली आहे.