Accident video: दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता. पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल मित्रा जिंकलस!
मृत्यू कोणालाही कुठेही, कधीही गाठू शकतो. अनेकदा लोक नकळत या अपघातांचे बळी ठरतात. कधी इतरांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचतात, तर कधी या अपघातांमुळे त्यांना जीव गमवावा लागतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या समजुतीने आपल्या मित्राला सुखरूप वाचवले.
दोस्ताला मृत्यूच्या दारातून खेचलं
या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे, रात्रीची वेळ असून एक व्यक्ती आपले दुकान बंद करत आहे. ती व्यक्ती त्याच्या दुकानाचे शटर खाली करत असतानाच त्याला विजेचा शॉक लागतो. विजेच्या धक्क्यामुळे ती व्यक्ती शटरला चिकटून बसते आणि विजेच्या धक्क्याने जोरात थरथर कापू लागते. यावेळी जवळच उभा असलेला त्याचा साथीदार हे सर्व पाहत आहे. सुरुवातीला त्याला काय होत आहे ते समजत नाही. जेव्हा तो त्या व्यक्तीकडे जातो आणि त्याला शटरपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यालाही विजेचा झटका बसतो, त्यानंतर तो घाबरून मागे हटतो आणि मग आपल्या साथीदाराला कसे वाचवायचे याचा विचार करू लागतो. प्रथम तो काहीतरी शोधण्यासाठी आजूबाजूला पाहतो, जेणेकरून तो त्याच्या मित्राला विजेच्या झटक्यापासून वाचवू शकेल. मात्र, नंतर त्याला कल्पना येते. तो ताबडतोब त्याच्या गळ्यातील टॉवेल काढतो आणि त्याच्या जोडीदाराच्या गळ्यात अडकवून त्याला मागे खेचतो. या एका प्रयत्नामुळे त्याचा जीव वाचतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: दादा, हात सोडू नका! मरेन मी! चोराला प्रवाशांनी खिडकीत लटकवलं, ट्रेन सुस्साट सुटली अन् मग…
दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर आपल्या भावनिक कमेंट केल्या आहेत. तर अशा प्रकारे पटकन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून मित्राला वाचवणाऱ्या व्यक्तीचे नेटकऱ्यांनी आभरा मानले आहेत.
