Premium

अरे देवा! विचित्र पदार्थांमध्ये अजून एकाची भर… सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सफरचंद इडलीचा व्हिडीओ पाहिलात का?

दोन गोष्टी एकत्र करून सध्या बरेच पदार्थ बनवले जात आहेत. अशा विचित्र पदार्थांच्या यादीत आता सफरचंद इडलीची भर पडली आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे पाहा.

Apple idli viral video
सोशल मिडियावर व्हायरल होणारा सफरचंद इडलीचा हा व्हिडिओ पाहा. [photo credit – Instagram]

सोशल मीडियावर एखादा ट्रेंड आला की, मग तो वाऱ्यासारखा सगळीकडे पसरत जातो. कधी एखादे गाणे चर्चेत असते; तर कधी त्यावर केलेला व्हिडीओ व्हायरल होत असतो. पण, सध्या दोन गोष्टी एकत्र करून पदार्थ बनवण्याचा जो काही ट्रेंड आला आहे, त्यामध्ये सगळे जण त्यांच्या मनाला वाटेल ते पदार्थ बनवत आहेत. कोणी फॅन्टा मॅगी बनवतोय, तर कुणी ओरियो वडे, तर काही जण चक्क संत्र्याच्या सरबतात चीज घालून पित असल्याचे व्हिडीओ, बातम्या पाहायला मिळत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @thegreatindianfoodie या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती चक्क सफरचंद घालून इडली विकत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत असून, त्याला सहा लाख ७५ हजार व्ह्युजदेखील मिळाले आहेत. या व्हिडीओमधील व्यक्ती केवळ इडलीवर सफरचंदाच्या फोडी ठेवून देत असेल, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तसे अजिबात नाही.

हेही वाचा : अरेच्चा! बूट आहेत की पाय? Louis Vuitton च्या ‘इल्युजन हाय बूट्स’ची किंमत बघून व्हाल थक्क!

व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती सफरचंदाच्या बारीक फोडी करून घेते. त्यानंतर डब्यातील इडलीचे पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊन, त्यामध्ये सफरचंदाच्या फोडी टाकून मिश्रण ढवळून घेतले जाते. नंतर हे मिश्रण सफरचंदाचा आकार असणाऱ्या एका ट्रेमध्ये घालून घेऊन इडल्या शिजवून घेण्यात येतात. शेवटी या इडल्या एका डिशमध्ये काढून, त्यावर सफरचंदाची एक फोड आणि डाळिंब दाणे घालून डिश सजवण्यात येते आणि चटणी व सांबार यांच्यासोबत खाण्यासाठी देण्यात येत असल्याचे पाहायला मिळते.

आता या अशा व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येणार नाहीत, असे होणार नाही. तेव्हा सफरचंद इडली या पदार्थाबाबत नेटकरी काय प्रतिक्रिया देतात हेसुद्धा पाहा.

“दोन भिन्न पदार्थ आपापल्या जगात खूप सुखी होते. पण, मग एके दिवशी या माणसाने त्यांचे लग्न लावून दिले आणि आता त्यांना या दुःखी संसारात अडकवून ठेवले आहे,” अशी प्रतिक्रिया एकाने दिली. दुसरा “हा व्हिडीओ बघून मनाला फारच त्रास झाला आहे,” असे म्हणतो आहे; तर तिसऱ्या व्यक्तीने, “सर्व दक्षिण भारतीयांना या व्हिडीओमुळे धक्का बसला आहे,” असे म्हटले आहे. शेवटी चौथ्याने “दादा, तुम्ही यावर आंब्याच्या फोडी आणि न्यूटेला घालायला विसरलात की..” अशी कमेंट केलेली पाहायला मिळते.

@thegreatindianfoodie या अकाउंटने शेअर केलेल्या सफरचंद इडलीला चार हजार लाइक्सदेखील मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man selling weird combination of apple and idli and calling it apple idli watch this viral video dha

First published on: 04-12-2023 at 21:58 IST
Next Story
Video: ‘तुझ्यासारखा कोणीच नव्हता अन् कोणीही नसेल!’ शाहरुख खानला भेटण्यासाठी कुटुंबाचा छोटासा प्रवास…