साप म्हटलं तरी घाम फुटतो. साप समोर दिसला तर तोंडाची बोबडीच वळते. सापाचे तुम्ही आजवर बरेच व्हिडीओ पाहिले असतील. कधी बाईक, कधी कार, कधी चप्पल, कधी सोफा, कधी किचन अशा किती तरी ठिकाणी साप लपून बसल्याची प्रकरण समोर आली आहेत. या वेळी सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलवले जाते. पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये साप अशा ठिकाणी लपून बसला होता ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. हा साप चक्क एका व्यक्तीच्या बुटाच्या आत साप लपून बसल्याची घटना समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घराबाहेर ठेवलेल्या बुटांमध्ये पाय घालताना थोडं सावध राहा. कारण त्यामध्ये एखादा साप देखील असू शकतो. होय, असाच एक व्हिडीओ समोर आलाय. गेल्या काही काळात मुसळधार पावसामुळे सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरलेय. त्यामुळे साप आपला जीव वाचवण्यासाठी मानवी वस्तीमध्ये शिरू लागले आहेत. कोणी गाड्यांमध्ये शिरतेय तर कोणी बाथरूममध्ये. काही वेळेस तर साप बुटांमध्ये देखील जाऊन बसतात. 

 एक व्यक्ती घराबाहेर ठेवलेले आपले बुट घालायला गेला. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की या बुटांमध्ये चक्क नाग बसला आहे. पाय बुटांजवळ नेताच तो नागानं आपला फणा काढला. पावसाच्या दिवसांमध्ये आपल्याला अशा जनावरांपासून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ते कुठे लपतील याचा काही नेम नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्ट नीट तपासून वापरणे गरजेचे आहे

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video Viral: हे फक्त मुंबई लोकलमध्येच घडू शकतं! चक्क ट्रेनमध्ये वाळत टाकले कपडे, Video होतोय व्हायरल

 जे लोक जंगलाच्या परिसरात राहतात, ते जेव्हा आपले बूट घालतात तेव्हा ते नेहमी झाडून घेतात. बुटांच्या आतमध्ये साप किंवा विंचू किंवा इतर कोणतेही विषारी प्राणी तर लपलेले तर नाही ना, याची ते खात्री करून घेतात. अनेकदा लोक आपल्या वस्तू न तपासता घालतात. यामुळे त्यांना जीवही गमवावा लागू शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man shocked after seeing cobra snake in shoes video viral on social media srk