अनेक वेळा आपण सोशल मीडियावर असे व्हिडीओ पाहतो, जे आपल्याला अधिक काळजी घेण्यासाठी सावध करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथील हा व्हिडीओ आहे. निष्काळजीपणाने रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या एका सायकल रिक्षाचालकाबरोबर घडलेली घटना पाहुन तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
या व्हिडीओमध्ये एक सायकल रिक्षाचालक त्यातून खाली उतरत, सायकल रिक्षा हाताने चालवत रेल्वे रुळ ओलांडत आहे. यावेळी लाल सिग्नल लागलेला दिसत आहे तरी तो व्यक्ती तसाच सायकल रिक्षा घेऊन रेल्वे रुळ ओलंडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात वेगाने रेल्वे तिथून जाते, पण रेल्वे जवळ येण्याच्या काही सेकंद आधी त्या व्यक्तीला रेल्वे जवळ आल्याचे जाणवते आणि तो मागे जातो. काही सेकंदाच्या अंतराने रेल्वे रुळापासून मागे सरकल्यामुळे त्या सायकल रिक्षाचालकाचा जीव वाचतो.
हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एएनआयने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना नेहमी सतर्क राहावे, नाहीतर जराश्या निष्काळजीपणामुळे जीवावर बेतू शकते ही गोष्ट या व्हिडीओमुळे समजते. हा व्हिडीओ १३ हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे, तसेच अनेक जणांनी व्हिडिओ शेअर करत अशावेळी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.