Viral video: आयुष्यात योग्य जोडीदार मिळणे आणि त्याने नेहमी साथ निभावणे हे नक्कीच आव्हानात्मक असते.प्रत्येकाला आपलं लग्नानंतर आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुखदुःख तर येतातच मात्र ती झेलताना आपल्याबरोबर आपला जोडीदार योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. नात्याचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. जर तुम्ही जो जोडीदार निवडत आहात तो वा ती नात्याचा वा तुमचा आदर करत नसेल तर सर्व व्यर्थ आहे. तुम्ही आणि तुमच्या कामाला समजून घेऊन योग्य आदर देणारी व्यक्तीच तुमची योग्य जोडीदार होऊ शकते. जर तुम्हाला योग्य आदर न देता केवळ गृहीत धरणारी व्यक्ती असेल तर कधीच संसार सुखाचा होऊ शकत नाही अथवा नातं टिकू शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्यात एक वेळा पैसा कमी असेल तरी चालेल

आयुष्यात एक वेळा पैसा कमी असेल तरी चालेल पण योग्य जोडीदार असणे महत्त्वाचे आहे. काही जण आपलं नातं नेहमीच नव्यासारखं ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ते आपल्या जोडीदाराच्या आनंदाचा ते नेहमीच विचार करत असतात. अशातच एका व्यक्तीने आपल्या बायकोसाठी कारच्या मागे असं काही लिहलंय की यावरुन तो आपल्या बायकोवर किती प्रेम करतो हे दिसतंय. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज

नाते कसेही असो त्यात गोडवा वाढवचा असेल तर त्यात नाविण्य आवश्यक आहे. हेल्दी रिलेशन हे परस्पर आदर आणि प्रयत्नांवर बांधले जातात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेव्हा तुम्हाला एक सहज स्पार्क जाणवला असेल. पण जसजसे तुमचे नाते पुढे जाईल तसतसे तुम्हाला हे जाणवत असेल की, तो स्पार्क टिकवून ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. असाच प्रयत्न या व्यक्तीने केलाय, आता तुम्ही म्हणाल असं काय केलंय त्यानं. कारच्या मागे त्यानं काय लिहलंय? तर या व्यक्तीने आपल्या कारच्या मागे “सुंदर माझी बायको” असं लिहलं आहे. हे छोटसं वाक्य पण त्याच्या बायकोला ते केवढा आनंद देऊन जात असेल. या कारकडे सगळ्यांचंच लक्ष जात आहे.

हा व्हिडीओ traworld_point नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला “अच्छी ज़िंदगी जीने के लिए पैसा नहीं..अच्छा हमसफ़र होना चाहिये” असं कॅप्शन दिलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> २०२४ मध्ये गणपती बाप्पा कधी येणार? तारीख लक्षात ठेवा; मुंबईत लागले बाप्पाच्या आगमनाचे बोर्ड, VIDEO व्हायरल

प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणीही वेगळी असते. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारे जोडीदार हवेत. नात्यात स्वातंत्र्याला अत्यंत महत्त्व आहे. तुम्ही जर तुमचे विचारच मांडू शकत नसाल तर तुमचे नाते अथवा तुमचा जोडीदार अजिबात योग्य नाही. आयुष्यात कोणताही निर्णय घेताना तुम्ही एकमेकांना विचारात घेतले नाही अथवा विचारांचा आदर ठेवला नाही तर दुरावा निर्माण होऊ शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man wrote message for his wife in back of the car video goes viral on social media srk
First published on: 10-06-2024 at 13:36 IST