Viral video: आयुष्यात योग्य जोडीदार मिळणं आणि त्यानं नेहमी साथ निभावणं हे नक्कीच आव्हानात्मक असतं. प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं, असं वाटत असतं. सुख-दुःखं तर येतातच; मात्र ती झेलताना आपल्याला योग्य जोडीदार लाभला असेल, तर जास्त त्रास होत नाही. मात्र, जोडीदाराची निवड चुकली, तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. नात्याचा आदर करणं सर्वांत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जो जोडीदार निवडत आहात, तो वा ती दोघांतील नात्याचा आदर करीत नसेल, तर सर्व व्यर्थ आहे. तुम्ही आणि तुमच्या कामाला समजून घेऊन योग्य आदर देणारी व्यक्तीच तुमची योग्य जोडीदार होऊ शकते. जर तुम्हाला योग्य आदर न देता, केवळ गृहीत धरणारी व्यक्ती असेल, तर संसार कधीच सुखाचा होऊ शकत नाही अथवा नातं टिकू शकत नाही.

आयुष्यात पैसा कमी असेल तरी चालेल पण..

आयुष्यात एक वेळ पैसा कमी असेल तरी चालेल; पण योग्य जोडीदार असणं महत्त्वाचं आहे. काही जण आपलं नातं नेहमीच नव्यासारखं ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ते आपल्या जोडीदाराच्या आनंदाचा नेहमीच विचार करीत असतात. अशातच एका व्यक्तीनं आपल्या बायकोसाठी कारच्या मागे असं काही लिहिलंय की, त्यावरून तो आपल्या बायकोवर किती प्रेम करतोय हे दिसतंय. तसंच बायकोही नवऱ्याच्या सुख-दु:खांत त्याच्यासोबत उभी असणार हे यावरून स्पष्ट होतंय. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

गाडीच्या मागे असं लिहलंय तरी काय ?

नवरा-बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक; पण लग्न झाल्यानंतर जसं नातं फुलत जातं तशी ही गाठ घट्ट होत जाते. आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवलीय, असा विश्वास जरी असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहण्यासाठी नवरा-बायको अशा दोघांनाही प्रयत्न करावे लागतात. नवरा-बायकोचं नातं म्हणजे ऊन-सावलीचा खेळ. कधी रुसवा-फुगवा, तर कधी खळखळून वाहणारा हास्याचा धबधबा. त्यामुळे या प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतोच किंवा हे प्रेम शब्दांत व्यक्त करता येतंच असं नाही. नवराब-बायको जसे सुखात एकत्र असतात तसेच एकमेकांच्या दु:खातही सारखेच भागीदार होतात, तेव्हा ते नातं आणखी टिकतं. असाच प्रयत्न या व्यक्तीनं केलाय. आता तुम्ही म्हणाल, असं काय केलंय त्यानं. कारच्या मागे त्यानं काय लिहिलंय? तर या व्यक्तीनं आपल्या कारच्या मागे ‘बायकोची साथ’ असं लिहिलं आहे. हे वाक्य छोटंसं असलं तरी त्याच्या बायकोला ते केवढा आनंद देऊन जात असेल. या कारकडे सगळ्यांचंच लक्ष जात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्हीही रस्त्यावरचे मोमोज मोठ्या आवडीने खाता ना? विक्रेत्याचा ‘हा’ किळसवाणा VIDEO पाहून झोप उडेल

सोशल मीडियावर h_d_raut_patil007 नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ‘देवाची नाही, आई-वडिलांची नाही, भावा-बहिणीची नाही; बायकोची साथ’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.