Men scare puppies : अनेकदा रस्त्यावरुन चालताना आपल्यासमोर भटके कुत्रे येतात. कधी आपण त्या कुत्र्यांना घाबरुन पळून लावतो तर कधी दगड मारुन दगड किंवा काटी दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न करतो. अशाच प्रकारे रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांनी केले, पण काही मिनिटातच त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.
कुत्र्याची दोन पिल्ले रस्त्याने जात असतात. यावेळी समोरुन येणारे दोन तरुण त्या पिल्लांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हाताने मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र यानंतर काही वेळाने असे काही घडते ज्याच्यावर तुमचा ज्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. यावेळी दोन्ही तरुण रस्त्याने जीव तोडत पळत सुटतात.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण रस्त्यावरुन चालत जात असतात, यावेळी कुत्र्याची दोन पिल्ले त्यांच्या दिशेने धावत येत असतात. यावेळी तरुण घाबरुन हातात दगड असल्याचे भासवत त्यांना हकलून लावतात. यावेळी पिल्ले देखील घाबरून तिथून पळून जातात. पण ही गोष्ट इथेच संपत नाही, काही वेळाने तिच पिल्ले एका मोठ्या कुत्र्याला आपल्यासोबत घेऊन येतात, जे पाहून ते तरुण खूप घाबरतात. काय घडतेय हे समजण्याचा तो मोठा कुत्रा आणि पिल्ले दोन्ही तरुणांच्या मागे पळत सुटतात. यावेळी ते तरुणही आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटतात. जसे कर्म तसे फळ याचा हा उत्तम पुरावा देणारा व्हिडीओ आहे.
@TheFigen नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कोणलाही कमी लेखू नका, तुमच्यापेक्षा बलवान कोणीतरी नेहमीच असते. या व्हिडीओने अनेकांना खूप हसवले आहे. ज्यावर युजर्स देखील भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या दोन लहान पिल्लांना एक मोठा भाऊही आहे हे कदाचित त्यांना माहित नसेल, असे एका युजरने म्हटले आहे.