जगभरात अशा अनेक घटना घडत असता त्या कित्येकदा सर्वांना आश्चर्यचकीत करतात. असेच काहीसे अमेरिकेत घडलेले प्रकरण सध्या चर्चेत आहे. अवघ्या ८ वर्षाचा मुलगा २० अंशा तापमानामध्ये २ दिवस अडकला होता. दरम्यान या याकाळात या मुलाने स्वत:ला जीवंत ठेवण्यासाठी जे काही केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसत आहे. एवढंच नव्हे तर बचावक पथकालाही जीवंत राहण्यासाठी मुलांने लढवली शक्कल पाहून थक्क झाले आहेत.

जंगलात वाट चूकला होता ८ वर्षाचा मुलगा

हे आश्चर्यकारक प्रकरण यूएसएच्या विस्कॉन्सिनमधून समोर आले आहे, जिथे एका मुलाने -२० अंश तापमानात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. नॅन्टे नेमी असे या ८ वर्षीय मुलाचे नाव असून, तो कुटुंबासाठी लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता, मात्र यादरम्यान त्याचा रस्ता चुकला.

मिशिगनमधील पोर्क्युपिन माउंटन वाइल्डरनेस स्टेट पार्कमध्ये नॅन्टे निमी दोन दिवस आणि दोन रात्री एकट्यानेच काढल्या. (Hurley School District)

2 दिवस बर्फाच्या वादळामध्ये अडकला होता नॅन्टे नेमी

तो रस्ता संपेपर्यंत चालत राहिला दुसरीकडे कुठेतरी भटकत पोहचला आणि जेव्हा त्याला वाटले की आता तो तिथे अडकला आहे आणि बाहेर पडणे अशक्य आहे, तेव्हा त्या मुलाने एका छोट्या टेकडीवरून खाली उडी मारली आणि झाडाजवळ लपून राहिला. आश्चर्याची बाब म्हणजे 2 दिवस बर्फाच्या वादळात अडकलेल्या या बालकाने केवळ लोकरीचा टी-शर्ट आणि पँन्ट घालून स्वतःला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला.

थंडी आणि वादळापासून वाचण्यासाठी नॅन्टेने लढवली शक्कल

थंडी आणि वादळापासून वाचण्यासाठी मुलाने झाडाच्या फांद्यांच्या साहाय्याने झोपडीसारखे घर बांधल्याचे सांगितले जात आहे. सोबतच पानांच्या साहाय्याने घोंगडीसारखी वस्तू तयार करून पलंगही तयार केला होता. या दरम्यान मूल पाणी पिण्यासाठी स्वच्छ बर्फ खात असे.

नांटे यांनी शोध पथकाला सांगितले की, त्याने बाहेर जाण्यापेक्षा जंगलात राहणे पसंत केले.(Hurley School District)

150 हून अधिक सुरक्षा कर्मचारी हरवलेल्या मुलाचा घेत होते शोध


दुसरीकडे मुलाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता बचावकार्य सुरू केले. मुलाला वाचवण्यासाठी, 150 हून अधिक सुरक्षा कर्मचारी गुंतले होते, जे सर्वत्र मुलाचा शोध घेत होते. दरम्यान, नऊ हेलिकॉप्टरच्या मदतीने सुमारे 40 चौरस मैल क्षेत्राच्या प्रत्येक कोपऱ्याचा शोध घेण्यात आला, त्यानंतर हा मुलगा झाडाखाली लपलेला आढळला. मिशिगन पोलिसांनी आधी हेलिकॉप्टरच्या मदतीने मुलाला बाहेर काढले आणि नंतर त्याची त्याच्या कुटुंबीयांशी सुखरूप भेट घडवून दिली, असे सांगण्यात येत आहे.