Mother Desi Jugaad Video : आईचं प्रेम खरं, स्वच्छ आणि तितकंच मौल्यवान असतं. आईचं प्रेम, निरागसता आणि तितक्याच भाबडेपणाशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. यात ९० च्या दशकातील अनेक आईंना ना इन्स्टाग्राम माहिती, ना अॅस्थेटिक टिफिन ट्रेंड… पण तिला तिच्या मुलांच्या खाण्या-पिण्याची, आरोग्याची तितकीशी काळजी असते. अशाच एका निरागस आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तिने मुलाला ऑफिसला जाण्यास उशीर होत असल्याने आणि वेळीच डबा न सापडल्याने डाळ भरून देण्यासाठी असा काही जुगाड केला की, ते पाहून तुम्हाला हसू आवरणं अवघड होईल. हा व्हिडीओ पाहताना विचित्र वाटला तरी त्यातील आईचे प्रेम मात्र तितकेच खरं आहे.

या व्हिडीओत एक आई आपल्या मुलाला ऑफिसला नेण्यासाठी चक्क भांडी घासण्याच्या साबणाच्या डब्यात भाजी पॅक करून देते. होय, हा तोच हिरवा रंगाचा डबा आहे, ज्यात भांडी घासण्याचा साबण असतो. पण या आईने तो डबा स्वच्छ धुऊन लेकाला वरण दिले आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला एका पंजाबी तरुण आईच्या साधेपणाला आणि देसी जुगाडाला सलाम केला जात असल्याचं ऐकू येतंय. तो कॅमेऱ्याकडे हसून म्हणतो, “तर, देसी आई नेहमीच देसी आई असते. आईला काही मिळाले नाही म्हणून तिने भांडी घासण्याच्या साबणाच्या डब्यात वरण भरून दिले. तरुणाने तो डबा उघडताच त्यात त्याला वरण भरून दिल्याचे दिसले, जे पाहून सर्व जण हसत आहेत.

आईची निरागसता दाखवणारा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @balraj_matta नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले. एका युजरने लिहिले की, या वरणात १०० लिंबूंची ताकद नाही, तर १०० टक्के आईचे प्रेम आहे. दुसऱ्याने लिहिले, भाऊ, तू खूप भाग्यवान आहेस की, अशी आई मिळाली. कोणीतरी गमतीने म्हटले की, या डब्याचा सुगंध वेगळ्या पातळीचा असावा.

https://www.instagram.com/reel/DLydCCOTANw/?utm_source=ig_web_copy_link

आईचा भन्नाट जुगाड व्हिडीओ

हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आहे. तो केवळ एक व्हायरल व्हिडीओ नाही, तर ९० च्या दशकातील आई कमी संसाधनांमध्येही कशा प्रकारे संसार करायच्या आणि आपल्या मुलांप्रति असलेली काळजी कशा प्रकारे व्यक्त करायच्या हे दाखविणारा आहे.