Mother-in-Law Dance for Son-in-Law: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि खास क्षण असतो. त्यामुळे हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने खास प्रयत्न करीत असतो. लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यात वेगवेगळ्या गोष्टींची रंगत असते. कोणत्याही लग्नात नाच-गाणे नसेल, तर त्या लग्नात मजा येत नाही. लग्नात केवळ कुटुंबीयच नाही, तर नातेवाईक आणि मित्रमंडळींही आनंद लुटतात. अलीकडच्या काळात लग्नाचा असाच एक व्हिडीओही चर्चेत आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
सोशल मीडियावर कायमच अनेक कार्यक्रमांतील घटना व्हायरल होतात. मग कधी लग्नातील भावूक प्रसंग असो वा एखादा गमतीदार घडलेला किस्सा. लग्नात वधूने वरासाठी नाचणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. सहसा आजकाल सर्व वधू त्यांच्या जीवनसाथीचे नाचून स्वागत करीत असतात. त्यांच्या नृत्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतो, जो लोकांना खूप आवडतो. आता अशाच एका उत्साही सासूचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जावयाचे स्वागत करण्यासाठी सासूच्या नृत्याचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
सासूने जावयाच्या स्वागतासाठी केले जबरदस्त डान्स
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर rishabh_1708_ व vinitaansh9616 नावाच्या वापरकर्त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नवरदेव घोडीवर बसून मिरवणुकीसह दाराशी आला आहे. येथे वधूच्या बाजूचे अनेक लोक त्याचे स्वागत करण्यासाठी उभे आहेत. व्हिडीओमध्ये वधूची आई तिच्या जावयाचे स्वागत करण्यासाठी नाचत असल्याचे दिसून येते. ती ‘मेरे घर राम आये हैं’ या गाण्यावर नाचत आहे. इथे सासूकडून इतके सुंदर स्वागत झाल्यानंतर वरालाही खूप आनंद होत आहे. तो घोडीवर बसून हसत आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ काही क्षणांतच व्हायरल झाला. व्हिडीओ पोस्ट झाल्यापासून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडीओला सुमारे चार लाख लोकांनी लाइक केले आहे. प्रभावित झाल्यानंतर त्यांनी व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये स्पष्टपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने म्हटले आहे, “वाह… माझे डोळे पाणावले आहेत. आता तुम्ही फक्त मुलीला आनंदी ठेवा.” दुसऱ्या युजरने म्हटले आहे, “मुलीचे आई-वडील त्यांच्या जावयाला राम मानतात; पण मुलाचे आई-वडील त्यांच्या सुनेला सीता मानत नाहीत, दोघांच्या विचारसरणीत किती फरक आहे.”
येथे पाहा व्हिडीओ
तिसऱ्या युजरने म्हटले आहे, “तुम्ही दिलेले स्वागत आणि आदर, मुलाचे कर्तव्य आहे की, ते तुमच्या मुलीचा नेहमीच आदर करतील.”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटऱ्यांनी दिल्या आहेत.