Bhayndar local Fight Video: प्रवासादरम्यान अनेक वेळा सीटवरून प्रवाशांमध्ये वाद होत असतात. लांबचा प्रवास करणार्‍या प्रवाशाला पुढच्या प्रवासासाठी बसायला जागा मिळत नाही आणि त्यासाठी मग तो वाटेल ते करू लागतो, तेव्हा भांडण होण्याची शक्यता असते. सीटवरून प्रवाशांमध्ये होत असलेला वाद अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतो, ज्याचे व्हिडीओ सर्रासपणे व्हायरल होतात, आणि नेटकरी देखील असे व्हिडीओ खूप एन्जॉय करतात. आतापर्यंत तुम्ही लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोकलमधली महिलांची भांडण काही नवी नाही, त्यातल्या त्यात पुरुषांच्या भांडणाचे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक भाईंदर लोकलमधील पुरुषांमधील भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाला भांडणामध्ये थेट कानखाली लगावली आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

मुंबईत दर दिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या साधनाचा फायदा घेताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकीट काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं. एसी लोकलमध्येही हल्ली असा फुकटचा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एसी ट्रेनचं तिकीट सामान्य लोकलच्या तुलनेत जळपास १० पट महाग आहे. तरीसुद्धा इतकं महागडं तिकीट काढूनही मुंबईकरांना उभ्यानं लोंबकळत, हाणामाऱ्या करीत प्रवास करावा लागतोय. हल्ली एसी लोकलमध्ये चढण्यासाठीही रांग लावली जाते, मात्रा यातही काही महाभाग रांग तोडून लोकलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार पुन्हा एकदा दादर रेल्वे स्टेशनवर समोर आला आहे. यामुळेच भायंदर लोकलमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.डब्यात चढताना एका तरुणानं रांग मोडली आणि उडी मारून डब्यात चढला; ही गोष्ट पाठीमागे उभ्या असलेल्या लोकांना आवडली नाही. आणि मग डब्यात अक्षरशः हाणामारी सुरु झाली.

झालं असं की, ही घटना २० मे २०२५ रोजी दादरहून संध्याकाळी ६:२३ वाजता भाईंदरला जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनमध्ये घडली. एका प्रवाशाने ट्रेनमध्ये चढताना रांग तोडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे रांगेत उभ्या इतरांना त्रास झाला. या गोंधळात त्याचा फोन पडला आणि रागाच्या भरात त्याने दुसऱ्या प्रवाशाला थेट कानाखाली लगावली. यावेळी दोघं एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आणि शिवीगाळ करू लागले. शेवटी डब्यातील इतर प्रवासी मध्ये पडले आणि त्यांनी हे भांडण सोडवलं.

पाहा व्हिडीओ

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर only.accidents या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आता पर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहे. यात एका यूजरने लिहिले की, “सर्वांनी नीट नियम पाळले तर असं होणारच नाही. किंवा मग एका दिवशी कुणाचा जीव जाईल तेव्हाच हे थांबेल”. दुसऱ्या यूजरने लिहिले, “क्षणभराचा राग आयुष्यभर पश्चाताप”