Viral video: ट्रेनमध्ये भांडण होणं काही नवी गोष्ट नाही. जवळपास प्रत्येक ट्रेनमध्ये दररोज कोणीना कोणी किरकोळ कारणांवरून भांडताना दिसतं. पण हे या भांडणाचं रूपांतर हाणामारीत होऊ नये अन्यथा असं काही तरी घडतं. आता हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा. बसण्याच्या जागेवरून दोन प्रवाशांमध्ये भांडण झालं. दरम्यान रागाच्या भरात दोन प्रवासी अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले. ही धक्कादायक घटना त्याच डब्यात एका प्रवाशानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. अन् आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रवासादरम्यान अनेक वेळा सीटवरून प्रवाशांमध्ये वाद होत असतात. लांबचा प्रवास करणार्या प्रवाशाला पुढच्या प्रवासासाठी बसायला जागा मिळत नाही आणि त्यासाठी मग तो वाटेल ते करू लागतो, तेव्हा भांडण होण्याची शक्यता असते. सीटवरून प्रवाशांमध्ये होत असलेला वाद अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतो, ज्याचे व्हिडीओ सर्रासपणे व्हायरल होतात, आणि नेटकरी देखील असे व्हिडीओ खूप एन्जॉय करतात.आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोकलमधली महिलांची भांडण काही नवी नाही, त्यातल्या त्यात पुरुषांच्या भांडणाचे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक मुंबई लोकलमधील दोन पुरुषांमधील राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना मुंबईतील हार्बर लाईन रेल्वे मार्गावर घडली आहे. ठाणे-वाशी दरम्यान प्रवास करत असताना दोन प्रवासी आपापसात भिडले. हे भांडण सीटवरून झालं होतं. सुरुवातीला दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली आणि दोघेही एकाच सीटवर बसण्याचा प्रयत्न करत होते. परिणामी, पाहता पाहता या भांडणाने हाणामारीचं रूप धारण केलं. त्यानंतर दोघेही एकमेकांवर तुटून पडले. दोघांनीही लाथा-बुक्क्यांचा वापर केला. एकमेकांच्या विरोधात शक्य तितक्या ताकदीने दोघे लढले.
पाहा व्हिडीओ
लोकलचे हे प्रश्न कधी सुटणार
लोकलसेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. या लोकलमधून लाखो नागरिक हे रोज प्रवास करत असतात. मात्र, लांबचा प्रवास करताना जागा मिळवण्यासाठी वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नेहमीच होत असलेल्या अशा प्रसंगांवरून मुंबई लोकलचे हे प्रश्न कधी सुटतील हा प्रश्न पडतो.