Mumbai local viral video: मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. सध्याच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलचा वापर करणं अत्यंत सुलभ आणि सोपं मानलं जातं. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. परंतु, रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये काही तरुणींनी लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्यासारखं दिलात झापुक झुपूक या गाण्यावर थिरकायला लागाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई राणी अर्थात मुंबई लोकल ट्रेन. दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. लोकलमधून प्रवास करताना प्रत्येक क्षणाला प्रत्येकाला अनेक अनुभव मिळतात. कुठे प्रवाशांमध्ये छोट्या कारणावरुन हाणामारी? तर कुठे चक्क पुरुषांच्या कंपार्टमेंटमध्ये भजनाचा माहोल. सध्या सोशल मीडियावर असाच एक मुंबई लोकलमधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकलमध्ये या ५ तरुणी हिरव्या रंगाच्या साड्या नेसून डान्स करत आहेत. या तरुणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडींगला असणारं गाणं म्हणजेच, “कखेत कळसा गावाला वळसा कशाला? तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला” हे गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे. चालत्या लोकलमध्ये या तरुणी थिरकताना तोल न जाऊ देता परफेक्ट डान्स करताना पाहून सर्वच जण या तरुणींचं कौतुक करत आहेत. या ठिकाणी लोकल रिकामी असल्यानं त्यांना मोकळी जागा मिळाली आणि याचा या तरुणींनी पुरेपूर उपयोग करून घेतला.

पाहा व्हिडीओ

अगदी सोशल मीडियावरील रील्सपासून सर्वत्र या मराठी गाण्याची हवा पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा. हा व्हिडीओ सोशल मीडियावरriaa_2712 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांंगलाच पसंतीस उतरला आहे. अनेकांनी या तरुणींचं कौतुक करत व्हिडीओ शेयर करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय धावत्या रेल्वेत सर्वांसमोर डान्स करायला धाडस लागतं, असं म्हणत अनेकांनी डान्सला दाद दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local video of some girls dancing on a marathi song kakhet kalsa gavala valasa kashala in mumbais local train is going viral on social media srk