Mumbai Passenger Viral Video : मुंबई लोकलचा प्रवास हा मुंबईकरांसाठी सर्वात सुखाचा व सोयीचा मानला जातो. ट्रॅफिकमध्ये अडकून राहण्यापेक्षा पटकन लोकलने प्रवास करणे सगळ्यांनाच आवडते. पण, ऑफिसला जायच्या व यायच्या वेळी हाच प्रवास तितकाच जीवघेणा वाटतो. पण, या सगळ्या समस्यांमध्ये प्रत्येक मुंबईकर त्यांच्या सुखाचा मार्ग शोधून काढतो. कोणी वेळ कढून विणकाम, तर कोणी स्वयंपाकाची तयारी म्हणून भाजी निवडताना, कोण भजन गाताना, तर कोण लिपस्टिक लावून सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात असतो. पण, आजचा व्हायरल व्हिडीओ पाहून सगळेच थक्क होऊन जाल.

मुंबईच्या धावत्या लोकलचा प्रवास तुम्हाला दररोज काय दाखवून जाईल काहीच सांगता येत नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील या महिलेने तर हद्दच पार केली आहे. महिला तिच्या बॅगेतून धुतलेले कपडे काढते आणि दरवाज्या जवळ असणाऱ्या हँडलवर सुकवण्यास सुरुवात करते. एवढेच नाही तर बराच वेळ ती दरवाज्यासमोर उभी राहते आणि कपडे कपडे वाळले की नाही याची सुद्धा खात्री करण्यासाठी कमरेवर हात टेकवून उभी राहते; जे पाहून काही प्रवासी सुद्धा तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात.

“कपडे ट्रेनमुळे ओले झाले; त्यामुळे आता सुकवणार पण ट्रेनचं” (Viral Video)

पावसाचे दिवस असल्यामुळे घरात सुकत घातलेले कपडे सुद्धा १ ते २ दिवस वाळत नाहीत. अनेकदा प्रवासादरम्यान कपडे ओले होतात. त्यामुळे एक्स्ट्रा जोडी कपडे आपण बॅगेत ठेवतो. तर कदाचित तसेच काहीसे या महिलेबरोबर घडले म्हणून, बॅगेतून ओल्या कपड्याचे वजन नेण्यापेक्षा स्टेशनला उतरेपर्यंत कपड्याने सुकवण्याचा प्रयत्न करते असे तिच्या मनात आले असेल. पण, एका प्रवाशाने हा जुगाड पाहून त्याचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे; जो पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @itsmesonali.r या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून तर नेटकरी पोटधरून हसताना दिसत आहेत. एक युजर म्हणतोय “कपडे ट्रेनमुळे ओले झाले; त्यामुळे आता सुकवणार पण ट्रेनचं”, दुसरा युजर म्हणतोय “ती स्त्री आहे, ती काहीही करू शकते”, “कोणी तरी क्लिप द्या काकींना”, “मुंबई लोकल नाही ड्राय मशीन”, “मला माहिती आहे नक्की काय झालं असेल; काकी नातेवाईकांकडे राहायला गेल्या होत्या आणि धुतल्यानंतरही त्यांचे कपडे ओले राहिले होते. म्हणून ती ओले कपडे घेऊन जाण्याऐवजी त्यांनी ट्रेनमधेच वाळत घातले” ;आदी अनेक मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.